राष्ट्रकुल स्पर्धेसाठी बर्मिंगहॅमला गेलेले दोन पाकिस्तानी बॉक्सर बेपत्ता

राष्ट्रकुल स्पर्धांचा समारोप झाला झाल्यानंतर सुलेमान बलोच आणि नझिरुल्ला हे पाकिस्तानी खेळाडू बेपत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेसाठी बर्मिंगहॅमला गेलेले दोन पाकिस्तानी बॉक्सर बेपत्ता

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बर्मिंगहॅमला गेलेले दोन पाकिस्तानी बॉक्सर बेपत्ता झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे. पाकिस्तान आणि लंडनचे अधिकारी या बॉक्सरचा शोध घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रकुल स्पर्धांचा समारोप झाला झाल्यानंतर सुलेमान बलोच आणि नझिरुल्ला हे पाकिस्तानी खेळाडू बेपत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय महासंघाने याला दुजोरा दिला आहे. पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशनचे (पीबीएफ) सचिव नासेर तांग यांनी सांगितले की, बॉक्सर सुलेमान बलोच आणि नझिरुल्ला हे इस्लामाबादला येण्यापूर्वी काही तास आधी बेपत्ता झाले.

तांग म्हणाले की, "बेपत्ता खेळाडूंच्या पासपोर्टसह प्रवासाची कागदपत्रे महासंघाच्या अधिकाऱ्यांकडे आहेत. संघ व्यवस्थापनाने यूकेमधील पाकिस्तानी उच्चायुक्त आणि लंडनमधील संबंधित अधिकारी यांना सुलेमान आणि नझिरुल्ला बेपत्ता झाल्याची माहिती दिली आहे. बेपत्ता बॉक्सर्सची कागदपत्रे पाकिस्तानातून येणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी मानक कार्यप्रणालीनुसार (एसओपी) ठेवण्यात आली आहेत.."

राष्ट्रीय जलतरणपटू फैजान अकबर हंगेरीतील फिना वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून बेपत्ता झाल्याच्या दोन महिन्यांनंतर बॉक्सर बेपत्ता होण्याची घटना घडली आहे. अकबर चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झालेला दिसला नव्हता. बुडापेस्टमध्ये आल्यानंतर काही तासांनी तो त्याच्या पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांसह गायब झाला. जूनपासून त्याचा शोध अद्याप लागलेला नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in