भविष्यातील तारे शोधण्याची मोहीम आजपासून सुरू! युवा विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात भारताची अमेरिकेशी गाठ

झिम्बाब्वे येथे गुरुवार, १५ जानेवारीपासून युवा विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील सलामीच्या लढतीत आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ अमेरिकेशी दोन हात करणार आहे.
भविष्यातील तारे शोधण्याची मोहीम आजपासून सुरू! युवा विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात भारताची अमेरिकेशी गाठ
Published on

नवी दिल्ली : झिम्बाब्वे येथे गुरुवार, १५ जानेवारीपासून युवा विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील सलामीच्या लढतीत आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ अमेरिकेशी दोन हात करणार आहे.

आयपीएलमध्ये चेन्नईकडून छाप पाडल्यानंतर आयुष आता भारताचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीसुद्धा भारतीय संघाचा सदस्य आहे. भारताने नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले होते. भारताचा ब-गटात समावेश करण्यात आला असून त्यांना अनुक्रमे अमेरिका, न्यूझीलंड, बांगलादेश यांच्याशी दोन हात करायचे आहेत.

एकूम १६ संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून त्यांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. त्यांपैकी प्रत्येकी गटातील आघाडीचे तीन संघ सुपर-सिक्स फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर-सिक्समध्ये मग सहा-सहा संघांचे दोन गट बनवण्यात येतील. येथे प्रत्येक संघ आपल्या आधीच्या गटातील संघांविरुद्ध न खेळता अन्य गटातून आलेल्या तीन संघांशी खेळणार आहे.

सुपर-सिक्स फेरीतील आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. ६ तारखेला अंतिम सामना रंगेल. यंदा या विश्वचषकाचे हे १६वे पर्व आहे. भारताने सर्वाधिक ५ वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. २०२४मध्ये मात्र भारताला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.

logo
marathi.freepressjournal.in