US Open 2025 : सिन्नरचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; बुब्लिकचा उडवला धुव्वा

अलेक्झांडर बुब्लिकला सोमवारी रात्री उशिरा झालेल्या लढतीत ६-१, ६-१, ६-१ असे पराभूत करत यानिक सिन्नरने यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
US Open 2025 : सिन्नरचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; बुब्लिकचा उडवला धुव्वा
Photo : X
Published on

न्यूयॉर्क : अलेक्झांडर बुब्लिकला सोमवारी रात्री उशिरा झालेल्या लढतीत ६-१, ६-१, ६-१ असे पराभूत करत यानिक सिन्नरने यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

अग्र मानांकित सिन्नरने केवळ १ तास २१ मिनिटांत हा विजय मिळवला. स्पर्धेत दुसरी सर्वात दुसरा कमी वेळात संपलेला सामना होता. थॉमस मचाकने स्पर्धेच्या पहिल्या फेरीत १ तास २० मिनिटांत विजय मिळवला होता.

विम्बल्डन स्पर्धेपूर्वी जर्मनीतील हल्ले येथे जूनमध्ये झालेल्या लढतीत बुब्लिकने सिन्नरचा पराभव केला होता. परंतु तो सामना गवताच्या कोर्टवर खेळवण्यात आला होता. हार्ड कोर्टवर माजी यूएस ओपन विजेत्याला पराभूत करणे कठीणच नाही तर अशक्य मानले जाते. सिनरने हार्ड कोर्टवर सलग २५ ग्रँड स्लॅम सामने जिंकले आहेत. त्यात ऑस्ट्रेलियन ओपनचे दोनदा विजेतेपद आणि गतवर्षीच्या यूएस ओपनचा समावेश आहे.

आगामी सामन्यात बुधवारी सिन्नरसमोर १०वा मानांकित इटालियन खेळाडू लॉरेन्झो मुसेट्टीचे आव्हान आहे. त्याच दिवशी अन्य उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ॲलेक्स डी मिनाऊर आणि फेलिक्स अउगर-ॲलियसिमे हे आमनेसामने येणार आहेत.

कझाकिस्तानचा २३वा मानांकित बुब्लिक सध्या एटीपी टूरवरील सर्वाधिक ११ सामने सलग जिंकून फॉर्मात आहे. त्याने ३ विजेतेपदकेही पटकावली आहेत. त्याचा हा विक्रम अल्काराझच्या ६ विजेतेपदांनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. सिन्नरने सामन्यात एकूण ८६ गुण जिंकले, तर बुब्लिक फक्त ४६ गुण जिंकले. तसेच बुब्लिकने १३ डबल फॉल्ट्स केले. त्याचा फटका त्याला बसला. दरम्यान सिन्नरने सुरुवातीपासूनच शानदार खेळ करत सामन्यावर पकड मिळवली होती. त्याने प्रतिस्पर्धी बुब्लिकला आपल्या ताब्यात ठेवले होते. सोमवारी झालेल्या या सामन्यात त्याने बुब्लिकला मान वर काढण्याची संधीच दिली नाही.

नाओमी ओसाकाची आगेकूच

नाओमी ओसाकाने सोमवारी रात्री तिसऱ्या मानांकित कोको गॉफला केवळ एका तासात ६-३, ६-२ असे सहज पराभूत करत यूएस ओपनच्या महिला गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

एकदा का नाओमी ओसाका उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली, की मग तिला पराभूत करणे हे प्रतिस्पर्धी खेळाडूसाठी परीक्षा समजली जाते. मधल्या काळात ती खराब फॉर्मचा सामना करत होती. मात्र आता ती सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतली आहे. अमेरिकन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत करोलिना मुचोव्हाशी बुधवारी तिचा सामना होणार आहे. ओसाकाने आतापर्यंत ग्रँड स्लॅममध्ये जेव्हा चौथी फेरी ओलांडली आहे तेव्हा तिने विजेतेपद पटकावले आहे.

व्हीनस विल्यम्स-लेला फर्नांडिज उपांत्यपूर्व फेरीत

न्यूयॉर्क : व्हीनस विल्यम्सने लेला फर्नांडिजसोबत यूएस ओपन महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

सोमवारी, लुई आर्मस्ट्राँग स्टेडियममध्ये झालेल्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात, व्हीनस आणि फर्नांडिज यांनी १२व्या मानांकित एकाटेरीना अलेक्झांड्रोवा आणि झांग शुआई या जोडीचा ६-३, ६-४ असा पराभव केला.

व्हीनस विल्यम्स आणि लेला फर्नांडिज यांचा पुढचा सामना अव्वल मानांकित टेलर टाऊनसेंड आणि कॅटेरिना सिनीकोव्हा या जोडीशी होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in