वैभव सूर्यवंशीने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम; अवघ्या १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील १५ वर्षांचा खेळाडू वैभव सूर्यवंशी हा शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा भारताचा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
वैभव सूर्यवंशीने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम; अवघ्या १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
वैभव सूर्यवंशीने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम; अवघ्या १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण(Photo-X)
Published on

मँचेस्टर (पीटीआय) : बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील १५ वर्षांचा खेळाडू वैभव सूर्यवंशी हा शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा भारताचा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. या ऐतिहासिक कामगिरीसह त्याने महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा सुमारे ३७वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.

सचिन तेंडुलकरने वयाच्या १६ वर्षे २०५ दिवसांचे असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते, तर सूर्यवंशीने अवघ्या १५ वर्षे ९९ दिवसांचे वय असताना हा बहुमान मिळवला. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याला पदार्पणाची संधी मिळाली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात युवा खेळाडू म्हणून पदार्पण करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये वैभव सूर्यवंशी प्रथम स्थानावर असून महिलांमध्ये शेफली वर्मा १५ वर्षे २३९ दिवसांसह अव्वल स्थानी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा हसन रझा हा १४ वर्षे २२७ दिवसांसह सर्वात युवा खेळाडू आहे.

भारताची दमदार फलंदाजी

दरम्यान, युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचे पदार्पण १४ धावांवर संपले असले तरी तिलक वर्माच्या फटकेबाजीमुळे भारताने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ बाद १९० धावा केल्या. तिलकने ११ चेंडूंत नाबाद २४ धावा करताना जोफ्रा आर्चरच्या शेवटच्या षटकात १७ धावा कुटल्या. भारताकडून इशान किशनने सर्वाधिक ४९ धावा केल्या. अभिषेक शर्माने ४३ आणि कर्णधार श्रेयस अय्यरने ३७ धावा केल्या. जॅक्स आणि लिआम डॉसन यांनी प्रत्येकी १ बळी घेतला, तर आदिल रशीदने २ षटकांत २१ धावा दिल्या. अय्यर आणि किशन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली, मात्र ओल्ड ट्रॅफर्ड मैदानाच्या मोठ्या आकाराने भारताला २०० धावांचा टप्पा ओलांडू दिला नाही.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in