विराट कोहलीवर व्यंकटेश प्रसाद यांचा अप्रत्यक्षपणे निशाणा म्हणाले विश्रांतीऐवजी उचल...

दिग्गज खेळाडूंना ते फॉर्ममध्ये नसल्यामुळे वगळण्यात आले होते.
 विराट कोहलीवर व्यंकटेश प्रसाद यांचा अप्रत्यक्षपणे निशाणा म्हणाले विश्रांतीऐवजी उचल...
Published on

एक काळ असा होता की, फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडूंना त्यांची प्रतिष्ठा काय आहे, त्याकडे दुर्लक्ष करून संघातून बाहेर करण्यात येत होते. आता असे वाटते की, नियमात काही बदल केले आहेत. फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडूंना विश्रांती दिली जाते. हा प्रगतीचा मार्ग ठरू शकत नाही. विश्रांतीऐवजी उचलबांगडीच हवी, अशा शब्दात माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि संघ व्यवस्थापन यांना खडसावले.

सध्या खराब फॉर्मशी झगडणाऱ्या विराट कोहलीवर व्यंकटेश प्रसाद याने अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. प्रसाद म्हणाला की, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान आणि हरभजन सिंग यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंना ते फॉर्ममध्ये नसल्यामुळे वगळण्यात आले होते. यानंतर त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतून धावा केल्या आणि पुन्हा राष्ट्रीय संघात आले. त्यामुळे भारत फॉर्मात आला.

प्रसादने निदर्शनास आणून दिले की, देशात इतकी प्रतिभा आहे की, तुम्ही तुमच्या प्रतिष्ठेशी खेळू शकत नाही. भारताच्या महान मॅच-विनर्सपैकी एक अनिल कुंबळे अनेक प्रसंगी बाहेर बसले. काहीतरी मोठे साध्य करण्यासाठी ठोस कृती आवश्यक असते.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळविण्यात आलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. तो आता वेस्ट इंडिजविरुद्ध देखील खेळताना दिसणार नाही. विराटला विश्रांतीसाठी सुट्टी देण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसादने ट्विट केले.

logo
marathi.freepressjournal.in