मलेशिया मास्टर्स सुपर बॅडमिंटन स्पर्धेत 'या' खेळाडूंचा विजय

पारूपल्ली कश्यपने टॉमी सुगिआर्तोचा १६-२१, २१-१६, २१-१६ असा पराभव करून स्पर्धेची विजयी सुरुवात
मलेशिया मास्टर्स सुपर बॅडमिंटन स्पर्धेत 'या' खेळाडूंचा विजय

भारताची स्टार शटलर पी व्ही सिंधूने चीनच्या बिंग जियाओचा २१-१३, १७-२१, २१-१५ असा पराभव करून मलेशिया मास्टर्स सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत विजयी सलामी दिली. पुरुष एकेरीत साई प्रणीतने पहिल्या फेरीत टोकियो ऑलिम्पिक उपांत्य फेरीतील केविन कॉर्डन गौतेमालाचा २१-८, २१-९ असा पराभव करीत अभियानाला सुरुवात केली. पारूपल्ली कश्यपने टॉमी सुगिआर्तोचा १६-२१, २१-१६, २१-१६ असा पराभव करून स्पर्धेची विजयी सुरुवात केली.

दुसऱ्या फेरीत सिंधूचा सामना इंडोनेशियाची नात कुसुमा वरदानी आणि चीनच्या जिंग यी मेन यांच्यातील विजेतीशी होणार आहे. साई प्रणीत चीनच्या ली शी फेंगशी लढत देईल.

सिंधूची विजयी सलामीमुळे सिंधू आणि बिंग जियाओ यांच्यातील पराभव आणि विजयाचे अंतर ९-१० असे झाले आहे. म्हणजेच दोघींमध्ये आतापर्यंत झालेल्या १९ सामन्यांपैकी सिंधूने ९, तर बिंग जियाओने दहा सामने जिंकले आहेत. इंडोनेशिया ओपनमध्ये झियाओने पहिल्या फेरीतच सिंधूला पराभूत केले होते. बुधवारच्या सामन्यात सिंधूने सातत्यपूर्ण आघाडी घेतली. बिंग जियाओनेसुद्धा मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. या गेममध्ये सिंधूने झियाओचा २१-१५ असा पराभव केला. दुसऱ्या गेममध्ये जियाओने आक्रमक पवित्रा घेतला. सुरुवातीला झियाओ ६-३ नंतर ९-५ ने पुढे होती. त्यानंतर सिंधूने पुनरागमन करत गुणसंख्या १३-१३ अशी बरोबरीत आणली.

मात्र त्यानंतरही जियाओने आघाडी कायम राखली आणि अखेरीस २१-१७ असा गेम जिंकत सामना बरोबरीत आणला. सिंधूने जियाओविरुद्ध पहिला गेम जिंकताना एकतर्फी लढतीत जिओचा २१-१३ असा पराभव केला. या गेममध्ये एकदाच बरोबरी साधली गेली. त्यानंतर स्कोअर २-२ असा बरोबरीत राहिला. यानंतर सिंधूने आघाडी घेत खेळ एकतर्फी जिंकला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in