विनेशला अपीलच करायचे नव्हते ? वकील हरिश साळवेंचा दावा

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगट हिला १०० ग्रॅम वजन अधिक भरल्यामुळे अंतिम फेरीसाठी अपात्र ठरवण्यात आले.
Vinesh Phogat
PTI
Published on

नवी दिल्ली: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगट हिला १०० ग्रॅम वजन अधिक भरल्यामुळे अंतिम फेरीसाठी अपात्र ठरवण्यात आले. मात्र क्रीडा लवादाकडे अपील केल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडून मला अपेक्षेप्रमाणे मदत मिळाली नाही, असे म्हणणाऱ्या विनेशचे आरोप ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी खोडून काढले आहेत. विनेशला निकालाविरुद्ध अपीलच करायचे नव्हते, असा दावा साळवे यांनी केला आहे. :

ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी क्रीडा लवादाकडे अपील करण्यात आल्यानंतर विनेशची बाजू मांडली होती. मात्र त्यावेळी नेमके काय घडले, हेही सविस्तरपणे सांगितले. ते म्हणाले की, "आम्ही क्रीडा लवादाने विनेशची बाजू फेटाळून लावल्याच्या निर्णयाला आव्हान द्यायचे होते. पण एकदा क्रीडा लवादाने निर्णय दिल्यानंतर तिला पुन्हा त्या निर्णयाला आव्हान द्यायचे नव्हते. आम्हाला अपील दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे आणि माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही जोरदार संघर्ष केला. पण आमचे अपील फेटाळण्यात आले. लवादाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध आम्ही स्वित्झर्लंडच्या न्यायालयात आव्हान देऊ शकतो, असे मी त्यांना सांगितले. पण विनेश फोगाटने त्याला प्रतिसाद दिला नाही. नंतर तिच्या वकिलांनी मला सांगितले की, तिला पुढे जायचे नाही."

विनेशची बाजू फेटाळून लावल्याच्या निर्णयाला आव्हान द्यायचे होते. पण एकदा क्रीडा लवादाने निर्णय दिल्यानंतर तिला पुन्हा त्या निर्णयाला आव्हान द्यायचे नव्हते. आम्हाला अपील दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे आणि माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही जोरदार संघर्ष केला. पण आमचे अपील फेटाळण्यात आले. लवादाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध आम्ही स्वित्झर्लंडच्या न्यायालयात आव्हान देऊ शकतो, असे मी त्यांना सांगितले. पण विनेश फोगाटने त्याला विनेश फोगटच्या वकिलांमध्ये समन्वयाचा अभाव होता. त्यांना कोणतीही माहिती आमच्यासोबत शेअर करायची नव्हती. भारत सरकारची यात कोणतीच भूमिका नाही. भारतीय ऑलिम्पिक संघटना ही भारत सरकारपासून वेगळे आणि स्वतंत्रपणे काम करते. सरकारने हस्तक्षेप केला तर संघटना बाहेर पडते, अशी माहिती हरिश साळवे यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in