जागतिक कुस्ती स्पर्धेत विनेशची ऐतिहासिक कांस्यपदकाची कमाई

विनेशला पात्रता फेरीतच मंगोलियाच्या खुलन बटखुयागकडून पराभव पत्करावा लागला होता;
जागतिक कुस्ती स्पर्धेत विनेशची ऐतिहासिक कांस्यपदकाची कमाई

भारताची ऑलिम्पिक पदकविजेती महिला कुस्तीपटू विनेश फोगटने बुधवारी मध्यरात्री जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदकाची कमाई केली. जागतिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी विनेश ही भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे.

विनेशने महिलांच्या ५३ किलो वजनी गटातील कांस्यपदकासाठीच्या सामन्यात स्वीडनच्या एमा माल्मर्गेनचा ८-० असा सहज पराभव केला. खरे तर विनेशला पात्रता फेरीतच मंगोलियाच्या खुलन बटखुयागकडून पराभव पत्करावा लागला होता; मात्र खुलनने अंतिम फेरी गाठल्यामुळे रेपिचेज राऊंडद्वारे विनेश कांस्यपदकाच्या लढतीसाठी पात्र ठरली. यापूर्वी २०१९मध्ये कझाकस्तान येथे झालेल्या जागतिक स्पर्धेतही विनेशने कांस्यपदक पटकावले होते. ६८ किलो वजनी गटात भारताच्या निशा दहियाला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. जपानच्या एमी इशीकडून ती ४-५ अशी पराभूत झाली.

गतवर्षी ऑलिम्पिकमधील अपयशानंतर मी स्वत:च्या खेळाचे आत्मपरीक्षण केले. राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक उंचावल्यामुळे जागतिक स्पर्धेतही पदक जिंकेन, याची खात्री होती.

- विनेश फोगट

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in