Virat Kohali : विराटचा भीम पराक्रम ! वनडे क्रिकेटमध्ये ४७ वे शतक ठोकत केला १३ हजार धावांचा टप्पा पार

आज विराटने नाबाद खेळी १२२ धावांची खेळी करत अनेक विक्रम आलल्या नावावर केले आहेत.
Virat Kohali : विराटचा भीम पराक्रम ! वनडे क्रिकेटमध्ये ४७ वे शतक ठोकत केला १३ हजार धावांचा टप्पा पार
Published on

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने(Virat Kohali)ने कोलंबोमध्ये अक्षरश: धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने लागोपाठ चौथे शतक ठोकत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. कोलंबोमध्ये पावसाने बॅटिंग थांबवल्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी पाकिस्तानी गोलंदाजांच्या धुव्वा उडवला. यावेळी कोहलीने वादळी खेळी करत शकत ठोकले. हे शतक ठोकत असताना त्याने एक दिवसीय सामन्यात १३ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. आज विराटने नाबाद खेळी १२२ धावांची खेळी करत अनेक विक्रम आलल्या नावावर केले आहेत.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान १३ हजार धावांचा टप्पा विराट कोहलीने पार केला आहे. याआधी सचिन तेंडुलकरच्या नावावर हा विक्रम होता. पाकिस्तानविरोधात ९८ धावा करताच त्याच्या वनडे क्रिकेटमध्ये १३ हजार धावा पूर्ण झाल्या आहेत. सचिन तेंडुलकरला १३ हजार धावांचा टप्पा पार करायला ३२१ सामने लागले होते. विराटच्या आधी सचिन तेंडुलकर, कुमार संगाकारा, रिकी पाँटिंग, सनथ जयसुर्या यांनी हा टप्पा पार केला आहे.

या विक्रमाबरोबर विरोट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या ४७ वे शतक देखील ठोकले आहेत. त्याने सर्वात वेगवान ४७ शतके ठोकण्याचा विक्रम देखील आपल्या नावे केला आहे. सचिनने ४५२ सामन्यात ४९ शतके ठोकली होती. येत्या काही दिवसांत विराट त्याचा हा विक्रम देखील मोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोलंबोमध्ये विराटने पाकिस्तानी गोलंदांची चांगलीच धुलाई केली आहे. त्याने आर. प्रेमदास स्टेडिअमवर ११० च्या सरासरीने धावा चोपल्या आहेत. विराटने मागील चार सामन्यात चार शतके ठोकली आहेत. त्याने आजच्या सामन्यात नाबाद १२२ धावांची खेळी केली असून गेल्या तीन सामन्यात १२८*, १३१, आणि ११ धावा चोपल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in