विराट-अनुष्काच्या घरी पुन्हा हलला पाळणा, पुत्ररत्नाची प्राप्ती

विराट-अनुष्काने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
विराट-अनुष्काच्या घरी पुन्हा हलला पाळणा,  पुत्ररत्नाची प्राप्ती

नवी दिल्ली : भारतीय फलंदाज विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरुष्का लवकरच दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार असल्याच्या चर्चा चालू होत्या. अखेर विराटने बुधवारी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत अनुष्का दुसऱ्यांदा आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. अनुष्का शर्माने १५ फेब्रुवारीला गोंडस मुलाला जन्म दिला.

विराट-अनुष्काने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच या पोस्टमध्ये या दोघांनी त्यांच्या बाळाचं नाव देखील सांगितलं आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या विरुष्काने त्यांच्या चिमुकल्या बाळाचं नाव अकाय असं ठेवलं आहे. विराटने भारत-इंग्लंड यांच्यातील पूर्ण कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in