विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी स्मृती मानधनाबद्दल केली 'ही' मोठी घोषणा

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने स्मृती मानधनावर सर्वाधिक 3.40 कोटी रुपयांची बोली लावली. WPL लिलावात स्मृती सर्वात महागडी खेळाडू
विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी स्मृती मानधनाबद्दल केली 'ही' मोठी घोषणा

महिला प्रीमियर लीग 2023 (WCL 2023) ची तयारी जोरात सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने स्मृती मानधनावर सर्वाधिक 3.40 कोटी रुपयांची बोली लावली. WPL लिलावात स्मृती सर्वात महागडी खेळाडू ठरली. आरसीबीने एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, ऋचा घोष या स्टार खेळाडूंनाही सामील केले आहे, त्यामुळे बंगलोरचा संघ सध्या मजबूत दिसत आहे. संघात अनेक दिग्गज असल्याने कर्णधारपद कोणाकडे सोपवले जाणार याची सर्वांनाच उत्सुकता होती आणि शनिवारी विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी याची घोषणा केली. भारताची सलामीवीर स्मृती मानधना हिची आरसीबी महिला संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

स्मृतीने भारतीय महिला संघाचे नेतृत्व केले आहे. तिने भारतासाठी 4 कसोटी सामन्यात 1 शतक आणि 2 अर्धशतकांसह 325 धावा केल्या आहेत. तिने 77 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5 शतके आणि 25 अर्धशतकांसह 3073 धावा केल्या आहेत. तिने 113 T20I सामन्यात 2661 धावा केल्या आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ - स्मृती मानधना, एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, रेणुका सिंग, रिचा घोष, एरिन बर्न्स, दिशा कासट, श्रेयंका पाटील, कनिका, ए शोबाना, इंद्राणी रॉय, हीदर नाइट, डॅन व्हॅन निकेर्क, प्रीती बोस, पूनम खेमनार, कोमल झांजाड, मेगन शुट, सहाना पवार

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in