भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या चौथ्या कसोटीमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने दमदार शतक लगावले आहे. तब्बल ३ वर्षांनंतर त्याने कसोटीमध्ये आपल्या कारकिर्दीतील २८वी कसोटी शतक लगावले आहे. तसेच, तीनही फॉरमॅटमधील त्याचे हे ७५वे शतक ठरले आहे. त्यामुळे, तसेच भारतीय संघ हा आता मजबूत स्थितीमध्ये आला असून कोहलीच्या या शतकाची चांगलीच चर्चा होत आहे.
कोहलीचे हे २८वे कसोटी शतक आहे. २०१९मध्ये कोहलीने बांगलादेशविरुद्ध शेवटचे कसोटी शतक झळकावले होते. विशेष म्हणजे या मालिकेत पहिल्या ३ सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर चौथ्या कसोटीत त्याची ही ऐतिहासिक खेळी पाहायला मिळाली. तसेच, हे शतक त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७५वे शतक ठरले आहे.
दरम्यान, अहमदाबादमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८० धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देत भारतीय फलंदाजी चांगली कामगिरी केली आहे. विराट कोहली, सलामीवीर शुभमन गिलने शतकी खेळी केली. तर, चेतेश्वर पुजाराने ४२ आणि कर्णधार रोहित शर्माने ३५ धावा केल्या. तसेच, श्रीकर भरतनेही ४४ धावांची महत्त्वाची खेळी केली.