विराट-गंभीरला मैदानातला राडा भोवला ; भरावा लागणार एवढा दंड

कोहलीने लखनऊच्या मेयर्सशी संवाद साधत असताना लखनऊचा मार्गदर्शक गंभीरने मेयर्सचा हात पकडून त्याला कोहलीपासून दूर नेले
विराट-गंभीरला मैदानातला राडा भोवला ; भरावा लागणार एवढा दंड

विराट कोहली आणि गौतम गंभीर. भारतीय क्रिकेटला लाभलेले दोन मौल्यवान खेळाडू. भारताकडून एकत्रित खेळताना दोघांनी अनेकदा संस्मरणीय खेळी साकारून संघाला विजयी केले, मात्र आयपीएलमध्ये या दोघांतील मतभेद सर्वश्रुत आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील लढतीनंतरही याच विराट-गंभीर वादाचा नवा अंक पहावयास मिळाला.

लखनऊच्या डावादरम्यान १७वे षटक सुरू असताना कोहलीने लखनऊचा फलंदाज नवीन उल हकला डिवचले. त्यावेळी नवीनला सहन न झाल्याने त्यानेही कोहलीला प्रत्युत्तर दिले. दोघांनी एकमेकांच्या नजरेस नजरही भिडवली. इतकेच नव्हे, तर सामन्यानंतर हातमिळवणीच्या वेळेसही नवीनने कोहलीचा हात एकप्रकारे झटकून काहीतरी त्याला म्हणाल्याचे दिसते. यावेळी ग्लेन मॅक्सवेलने दोघांना दूर केले.

त्यानंतर कोहलीने लखनऊच्या मेयर्सशी संवाद साधत असताना लखनऊचा मार्गदर्शक गंभीरने मेयर्सचा हात पकडून त्याला कोहलीपासून दूर नेले. यामुळे कोहलीला राग आल्याने त्याने गंभीरला सुनावले व गंभीर-कोहलीमध्येही शाब्दिक बाचाबाची झाली.

अशी झाली कारवाई

मैदानावर झालेल्या बाचाबाचीमुळे गंभीर व कोहली दोघांनाही दंडाची शिक्षा भोगावी लागली. आयपीएल नियमांच्या कलम क्रमांक २.२१ नुसार कोहलीची सामन्याची फी म्हणजेच १.७ कोटी, तर लखनऊच्या प्रशिक्षक फळीचा भाग असलेल्या गंभीरला २५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. त्याशिवाय नवीन उल हकला सामन्याच्या मानधनापैकी ५० टक्के म्हणजेच १.७९ लाखांचा भुर्दंड भरावा लागणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in