विराट, पंतच्या अर्धशतकांमुळे दिल्लीचा सलग दुसरा विजय

एकीकडे रोहित दुसऱ्या लढतीत अपयशी ठरलेला असताना बंगळुरू येथे विराटने मात्र बॅटचा धडाका कायम राखला. विराट (६१ चेंडूंत ७७ धावा) व ऋषभ पंत (७९ चेंडूंत ७० धावा) या दोघांनी साकारलेल्या अर्धशतकांमुळे दिल्लीने विजय हजारे स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला.
विराट, पंतच्या अर्धशतकांमुळे दिल्लीचा सलग दुसरा विजय
विराट, पंतच्या अर्धशतकांमुळे दिल्लीचा सलग दुसरा विजयPhoto : X
Published on

बंगळुरू : एकीकडे रोहित दुसऱ्या लढतीत अपयशी ठरलेला असताना बंगळुरू येथे विराटने मात्र बॅटचा धडाका कायम राखला. विराट (६१ चेंडूंत ७७ धावा) व ऋषभ पंत (७९ चेंडूंत ७० धावा) या दोघांनी साकारलेल्या अर्धशतकांमुळे दिल्लीने विजय हजारे स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला.

ड-गटातील या लढतीत दिल्लीने गुजरातवर अवघ्या ७ धावांनी सरशी साधून गटात अग्रस्थान मिळवले. दिल्लीने केलेल्या २५४ धावांच्या प्रत्युत्तरात गुजरातचा संघ ४७.४ षटकांत २४७ धावांत गारद झाला. वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवने ३ बळी मिळवले. आता दिल्लीची पुढील लढतीत सोमवारी सौराष्ट्रशी गाठ पडेल.

विराट तब्बल १५ वर्षांनी या स्पर्धेत सहभागी झाला आहे. रोहितप्रमाणेच त्यानेही पहिल्या लढतीत शतक साकारले होते. ११ जानेवारीपासून भारताची न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी तो या स्पर्धेत खेळून लय टिकवत आहे. पंत दिल्लीचे नेतृत्व करत आहे.

प्रथम फलंदाजी करताना विराटने १३ चौकार व १ षटकारासह अर्धशतक साकारले, तर पंतने ८ चौकार व २ षटकारांसह ७० धावा केल्या. हर्ष त्यागी (४०) व नितीश राणा (१२) यांना मोठी खेळी साकारता आली नाही. मग गुजरातकडून आर्या देसाई (५७) व सौरव चौहान (४९) यांनी कडवी झुंज दिली. मात्र निर्णायक क्षणी ते बाद झाले व गुजरातला पराभव पत्करावा लागला. इशांत शर्मा व सिमरजीत सिंग यांनीही टिच्चून गोलंदाजी केली.

logo
marathi.freepressjournal.in