विश्वनाथन आनंदने नॉर्वेने बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसनवर केली मात

 विश्वनाथन आनंदने नॉर्वेने बुद्धिबळ स्पर्धेत  कार्लसनवर केली मात

दिग्गज भारतीय खेळाडू विश्वनाथन आनंदने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील क्लासिकल प्रकारात पाचव्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला मात दिली. या विजयासह आनंदने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. आनंदचे आता एकूण १० गुण झाले आहेत. विजेतेपद मिळविण्यासाठी त्याला उर्वरित चार फेऱ्यांमध्ये सातत्यपूर्ण खेळ दाखवावा लागेल. आनंदने सलग तीन विजयांसह या स्पर्धेत दमदार सुरुवात केली आहे.

क्लासिकल प्रकारात आनंदने आर्मागेडॉन (सडन डेथ बॅटल) सामन्यात मॅग्नसवर पुन्हा विजय मिळविला. नियमित ४० चालींचा खेळ झाल्यानंतर लढत अनिर्णीत राहिल्यामुळे आर्मागेडॉनची मदत घ्यावी लागली.

पाच वेळा विश्वविजेता असलेल्या आनंदने क्लासिकल प्रकारातील पहिल्या फेरीत फ्रान्सच्या मॅक्सिम व्हॅचियर लॅग्रेव्हवर विजय मिळविला होता. त्यानंतर बल्गेरियाच्या वेसेलिन टोपालोवला मात देत त्याने सलग दुसरा विजय नोंदविला. चीनच्या हाओ वांगचा पराभव करून आनंदने विजयाची हॅट‌्ट्रिक केली होती; मात्र सलग चौथा विजय नोंदवण्याच्या प्रयत्नात असलेल्या आनंदला अमेरिकेच्या वेस्लीकडून पराभव पत्करावा लागला होता. यापूर्वी, आनंदने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील ब्लिट्झ प्रकारातही मॅग्नस कार्लसनचा पराभव केला होता. तेव्हा कार्लसनचा पराभव करत त्याने सातव्या फेरीत चौथे स्थान पटकाविले होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in