T20 World Cup 2022 : भारत-न्यूझीलंड दुसरा सराव सामना होण्याची शक्यता कमी, अचानक पाऊस सुरू

दोन्ही संघ आधीच सुपर 12 मध्ये पोहोचले आहेत. टीम इंडियाने यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना जिंकला
T20 World Cup 2022 : भारत-न्यूझीलंड दुसरा सराव सामना होण्याची शक्यता कमी, अचानक पाऊस सुरू

टीम इंडिया आज T20 विश्वचषकाचा दुसरा सराव सामना न्यूझीलंड विरुद्ध (IND vs NZ) खेळणार आहे. दोन्ही संघ आधीच सुपर 12 मध्ये पोहोचले आहेत. टीम इंडियाने यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना जिंकला. मोहम्मद शमीने शेवटच्या षटकात कमाल केली. टीम इंडिया 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. त्याआधी टीम इंडियाला त्यांच्या तयारीचा आढावा घेण्याची आज शेवटची संधी आहे. ब्रिस्बेन च्या गाबा मैदानावर न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारत-न्यूझीलंड सामन्यात आधीच गाबा येथे अचानक पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे सामना वेळेवर सुरू होण्याची शक्यता कमी आहे. सध्या मैदानात सर्वत्र कव्हर आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in