निलंबित WFI कडून 'स्वतःची' राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, क्रीडा मंत्रायल म्हणाले - तुमची प्रत्येक स्पर्धा बेकायदेशीरच ठरवणार

क्रीडा मंत्रालयाने लादलेल्या निलंबनासंदर्भात निराधार वक्तव्य करणाऱ्या बडतर्फ महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा क्रीडा मंत्रालयाने दिला.
निलंबित WFI कडून 'स्वतःची' राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, क्रीडा मंत्रायल म्हणाले - तुमची प्रत्येक स्पर्धा बेकायदेशीरच ठरवणार

नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने लादलेल्या निलंबनासंदर्भात निराधार वक्तव्य करणाऱ्या बडतर्फ महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा क्रीडा मंत्रालयाने दिला. त्याचबरोबर या महासंघाच्या वतीने घेण्यात येणारा प्रत्येक कार्यक्रम, स्पर्धा ही बेकायदेशीरच ठरवली जाईल असे स्पष्ट केले.

निलंबनाच्या कारवाईनंतरही संजय सिंह यांनी पुण्यात वरिष्ठ गटाची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा घेतली असून, या स्पर्धेत सहाशेहून अधिक मल्ल सहभागी झाले आहेत. केवळ पंजाब आणि आसाम या दोन राज्यांनी आपला संघ पाठवलेला नाही. या स्पर्धेसंदर्भात तुमच्याकडून जे काही दावे केले जात आहेत ते निराधार असून, आपण घेत असलेली प्रत्येक स्पर्धा ही बेकायदेशीर असेल. देशातील कुस्तीचे कामकाज हे फक्त हंगामी समितीच बघू शकते आणि त्यांच्यामार्फत घेण्यात येणारी स्पर्धाच अधिकृत असेल, असे संजय सिंह यांना पाठवलेल्या पत्रात क्रीडा मंत्रालयाने नमूद केले आहे. निलंबनाविषयी आणि कुस्ती महासंघाच्या आस्तित्वाविषयी निराधार दावे करणे त्वरीत थांबवा. अन्यथा आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा स्पष्ट इशाराही क्रीडा मंत्रालयाने याच पत्राद्वारे दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in