वेटलिफ्टिंगपटू अचिंताची भारतासाठी तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई

मलेशियाच्या खेळाडून ३०३ किलो; तर कॅनडाच्या खेळाडूने २९८ किलो वजन उचलले.
 वेटलिफ्टिंगपटू अचिंताची भारतासाठी तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत युवा वेटलिफ्टिंगपटू अचिंता शेऊलीने ७३ किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक पटकाविले. २० वर्षीय अंचिताने भारतासाठी तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पश्चिम बंगालच्या या खेळाडूने १४३ किलो वजन उचलले. हा या स्पर्धेतील नवीन विक्रम ठरला. दरम्यान, मलेशियाच्या ई-हिदायत मोहम्मदला रौप्य; तर कॅनडाच्या शाद डारसिग्रीला कांस्य पदक मिळाले. मलेशियाच्या खेळाडून ३०३ किलो; तर कॅनडाच्या खेळाडूने २९८ किलो वजन उचलले.

शेऊलीने स्नॅच प्रकारामध्ये १४३ किलो वजन उचलले. हा या स्पर्धेतील विक्रम ठरला. शेऊलीनेच क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये १७० किलोसहित एकूण ३१३ किलो वजन उचलत या स्पर्धेमधील नवीन विक्रमाची नोंद केली. गतवर्षी जागतिक पातळीवरील ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये शेऊलीने रौप्यपदक मिळविले होते. शुलीने आपल्या तिसऱ्या संधीमध्ये राष्ट्रकुलमध्ये पदक मिळवून देणारे दोन्ही लिफ्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून अचिंताचे अभिनंदन केले. “अचिंताने राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी फार मेहनत घेतली आहे. अचिंता शांत स्वभाव आणि दृढत निश्चयासाठी ओळखला जातो. पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून त्याला शुभेच्छा,” जेरेमी लालरिननुंगा (सुवर्ण), मीराबाई चानू (सुवर्ण), संकेत सरगर (रौप्य), बिंदियाराणी देवी (रौप्य) आणि गुरुराजा पुजारी (कांस्य) यानंतर भारताचे वेटलिफ्टिंगमधील हे सहावे पदक ठरले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in