भारताचे ऑलिम्पिक पदक विजेते हॉकीपटू वेस पेस यांचे निधन

भारताचे माजी हॉकीपटू आणि टेनिसपटू लिएंडर पेसचे वडील डॉ. वेस पेस यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. कोलकाता येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
भारताचे ऑलिम्पिक पदक विजेते हॉकीपटू वेस पेस यांचे निधन
Published on

कोलकाता: भारताचे माजी हॉकीपटू आणि टेनिसपटू लिएंडर पेसचे वडील डॉ. वेस पेस यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. कोलकाता येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

१९७२च्या म्युनिच ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले होते. त्या संघाचा वेस हे भाग होते. वेस यांना काही दिवसांपूर्वी वूडलैंड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना बऱ्याच काळापासून पार्किन्सन आजार झाला होता. हात-पाय कंप पावल्यामुळे हा आजार होतो. वेस यांच्या दोन्ही मुली विदेशात स्थायिक असल्याने त्यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे समजते. तोपर्यंत त्यांचे पार्थिव कोलकाता येथेच ठेवण्यात येईल. वेस यांनी भारतीय महिला बास्टेकबॉल संघाची कर्णधार जेनिफर यांच्याशी विवाह केला होता.

गोवा येथे १९४५मध्ये जन्म झालेल्या वेस यांनी हॉकीमध्येभारतीय संघात मध्यरक्षकाची भूमिका बजावली. त्यानंतर १९९६ ते २००२ या काळात भारतीय रग्बी फुटबॉल युनियनचे ते अध्यक्ष होते. त्याशिवाय बीसीसीआय, आशियाई क्रिकेट परिषद व भारतीय डेव्हिस संघाचा सल्लागार म्हणूनही ते कार्यरत होते. १९७१ मध्ये बार्सिलोना येथे झालेल्या हॉकीविश्वचषकात भारताने कांस्यपदक जिंकले होते. त्या संघातही वेस यांचा समावेश होता. वेस यांचा मुलगा लिएंडरने टेनिसपटू म्हणून तब्बल १८ ग्रँडस्लॅम जेतेपदांना गवसणी घातली. वेस यांच्या निधनापश्चात भारतीय हॉकी महासंघाने हळहळ व्यक्त केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in