वेस्ट इंडिजचा संघ जाहीर ; माजी कर्णधार जेसन होल्डरचे संघात पुनरागमन

बांगलादेशविरुद्धच्या घरच्या टी-२० मालिकेत होल्डर संघाचा भाग नव्हता.
वेस्ट इंडिजचा संघ जाहीर ; माजी कर्णधार जेसन होल्डरचे संघात पुनरागमन

वेस्ट इंडिजने भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी सोमवारी १३ जणांचा संघ जाहीर केला. टीम इंडियाने वन-डे आणि टी-२० मालिकेसाठी आधीच संघ जाहीर केला आहे. माजी कर्णधार जेसन होल्डरचे संघात पुनरागमन झाले आहे. बांगलादेशविरुद्धच्या घरच्या टी-२० मालिकेत होल्डर संघाचा भाग नव्हता. निकोलस पुरन कर्णधारपदी कायम आहे.

क्रिकेट वेस्ट इंडिजच्या निवड समितीने (सीडब्ल्यूआय) मुख्य निवडकर्ता डेसमंड हेन्सच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जेसन जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. त्याला संघात परत आल्याने आम्हाला आनंद झाला आहे.

बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत वेस्ट इंडिजचा ३-० असा पराभव झाला. मात्र, शेवटच्या टी-२० मध्ये कर्णधार पुरनने ३९ चेंडूंत ७४ धावा केल्या. वेस्ट इंडिजला भारताविरुद्ध वन-डे आणि टी-२० मालिका खेळायची आहे.

वेस्ट इंडिज संघ : निकोलस पुरन (कर्णधार), शाई होप, शेमार ब्रुस, कीसे कार्टी, जेसन होल्डर, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मायर्स, गुडाकेश मोती, कीमो पॉल, रोव्हमन पॉवेल, जेडेन सील्स.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in