वेस्ट इंडिजने पहिला कसोटी सामना जिंकला,बांगलादेशचा पराभव

मालिकेत त्याने ७६.५० च्या सरासरीने एकूण १५३ धावा आणि सहा विकेट‌्स अशी चमकदार कामगिरी केली
 वेस्ट इंडिजने पहिला कसोटी सामना जिंकला,बांगलादेशचा पराभव

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशचा १० गडी राखून पराभव करत मालिका २-० ने जिंकली. वेस्ट इंडिजने पहिला कसोटी सामना सात विकेटने जिंकला होता. सामन्याच्या चौथ्या दिवशी विंडीजला विजयासाठी अवघ्या १३ धावांचे लक्ष्य मिळाले होते. हे लक्ष्य एकही विकेट न गमावता विंडीजने साध्य केले. काइल मेयर्स सामनावीर अन‌् मालिकावीर ठरला. त्याने या सामन्यात ३५ धावांच्या मोबदल्यात दोन बळी आणि १४६ धावा अशी चमकदार कामगिरी केली. मालिकेत त्याने ७६.५० च्या सरासरीने एकूण १५३ धावा आणि सहा विकेट‌्स अशी चमकदार कामगिरी केली.

बांगलादेशने चौथ्या दिवशी ५४ धावांत चार विकेट‌्स गमावल्या. बांगलादेशने चौथ्या दिवसाची सुरुवात सहा गडी बाद १३२ वरून पुढे सुरू केली. अलझारी जोसेफने मेहदी हसनला (२० चेंडूंत ४) बाद करून बांगलादेशला दिवसाचा पहिला धक्का दिला.

त्यानंतर इबादोत हुसेन (७ चेंडूंत ०), शॉरीफुल इस्लाम (२ चेंडूंत ०) आणि खालिद अहमद (३ चेंडूंत ०) हे झटपट बाद झाले. तिन्ही खेळाडू खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. नूरुल हसनने (५० चेंडूंत नाबाद ६०) एकाकी झुंज दिली. वेस्ट इंडिजकडून केमार रोच, अल्झारी जोसेफ आणि जेडेन सील्स यांनी प्रत्येकी तीन बळी टिपले.

बांगलादेशचा दुसरा डाव अवघ्या १८६ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे विजयासाठी वेस्ट इंडिजला अवघ्या १३ धावांचे लक्ष्य मिळाले.

क्रेग ब्रॅथवेट (६ चेंडूंत नाबाद ४) आणि जॉन कॅम्पबेल (११ चेंडूंत नाबाद) या सलामीवीरांनी एकही विकेट न गमावता विजयी लक्ष्य साध्य केले.

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशने पहिल्या डावात २३४ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने ४०८ धावांची मजल मारली. पहिल्या डावात वेस्ट इंडिजने १७४ धावांची आघाडी घेतली. बांगलादेशचा दुसरा डाव अवघ्या १८६ धावांत संपुष्टात आल्याने वेस्ट इंडिजला १३ धावांचे लक्ष्य मिळाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in