पुनरागमनाची घाई कशाला! तंदुरुस्तीच्या मार्गावर असलेला शमी देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सज्ज

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पायाच्या घोट्याच्या दुखापतीतून सावरला असला, तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी आपण घाई करणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले.
पुनरागमनाची घाई कशाला! तंदुरुस्तीच्या मार्गावर असलेला शमी देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सज्ज
Published on

नवी दिल्ली: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पायाच्या घोट्याच्या दुखापतीतून सावरला असला, तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी आपण घाई करणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले. पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याची चाचपणी करण्यासाठी गरज भासल्यास देशांतर्गत क्रिकेट नाही. खेळण्याचीही आपली तयारी असल्याचे ३४ वर्षीय शमीने नमूद केले.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर शमी कोणत्याही स्तरावर क्रिकेट खेळलेला नाही. घोट्याच्या दुखापतीमुळे या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्याने हलक्या सरावाला सुरुवात केली असली, तरी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये घाईने पुनरागमन करण्याचा धोका तो पत्करणार मी जितक्या चांगल्या स्थितीत बंगाल क्रिकेट संघटनेच्या वार्षिक पुरस्कार समारंभात शमीचा सत्कार करण्यात आला. या समारंभानंतर त्याला भारतीय संघातील पुनरागमनाबाबत विचारण्यात आले. यावर उत्तर देताना तो म्हणाला, "मी बऱ्याच काळापासून मैदानाबाहेर आहे. त्यामुळे लवकरच पुनरागमनाचा माझा प्रयत्न आहे. मात्र, मला तंदुरुस्तीवर अजूनही मेहनत घ्यावी लागणार आहे, जेणेकरून मैदानात उतरल्यानंतर कोणतीही अडचण जाणवणार नाही. शारीरिकदृष्ट्या पुनरागमन करेन, तितकेच ते माझ्यासाठी फायदेशीर ठरेल."

"मी कोणत्याही प्रकारची घाई करणार नाही. मैदानात पुनरागमन केल्यानंतर पुन्हा जायबंदी होऊन मला बाहेर जायचे नाही. बांगलादेश किंवा न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतच पुनरागमन करायचे आहे, असे कोणतेही लक्ष्य मी समोर ठेवलेले नाही. जितका वेळ लागेल, तितका लागेल. मी आता गोलंदाजीला सुरुवात केली आहे, पण १०० टक्के तंदुरुस्त आहे याची खात्री पटल्याशिवाय मी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार नाही," असे शमीने स्पष्ट केले.

रणजी करंडकाच्या नव्या हंगामात बंगालचे पहिले दोन सामने अनुक्रमे उत्तर प्रदेश (११ ऑक्टोबर) आणि बिहार (१८ ऑक्टोबर) यांच्याविरुद्ध होणार आहेत. यापैकी एका सामन्यात शमी खेळण्याची दाट शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in