ICC T20 World Cup 2022 : खरंच! पाकिस्तान सेमी फायनल गाठू शकतं का?

आयसीसी टी २० विश्वचषक (ICC T20 World Cup 2022) स्पर्धा आता रंजक झाली असून ग्रुप २मध्ये भारत पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली
ICC T20 World Cup 2022 : खरंच! पाकिस्तान सेमी फायनल गाठू शकतं का?

आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धा (ICC T20 World Cup 2022) आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचली आहे. तर ग्रुप २मधून सेमी फायनलमध्ये कोणते संघ जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे नाव सेमी फायनलसाठी निश्चित झाले असतानाच, पाकिस्तानच्या संघाने अजूनही सेमी फायनलची अशा सोडलेली नाही. भारत ६ अंक आणि ०.७३० नेट रनरेटसह अव्वल स्थानी आहे, तर दक्षिण आफ्रिकाचा संघ ५ अंकांसह दुसऱ्या स्थानी आहे. तसेच, पाकिस्तानचा संघ ४ अंकासह तिसऱ्या स्थानी आहे.

पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला मोठ्या फरकाने पराभूत करून सेमी फायनलसाठीचे आपले आव्हान कायम ठेवले आहे. सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी पहिले तर पाकिस्तानला बांगलादेशला खूप मोठ्या फरकाने हरवावे लागेल. तर पाकिस्तानला चांगल्या रनरेटसह ६ गन मिळतील. त्यानंतर नेदरलँड्सला दक्षिण आफ्रिकेवर मात करावी लागेल. तरच पाकिस्तानचा संघ हा ६ गुणांसह सेमी फायनलमध्ये प्रवेश करू शकेल. मात्र, याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे एक चमत्कारच पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवून देऊ शकतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in