विराटसाठी विश्वचषक जिंका! सेहवागचा भारतीय खेळाडूंना संदेश

कोहलीने ज्याप्रकारे त्याचा खेळ विकसित केला. तसेच तो दडपणाखाली ज्याप्रकारे कामगिरी उंचावतो, ते कौतुकास्पद आहे
विराटसाठी विश्वचषक जिंका! सेहवागचा भारतीय खेळाडूंना संदेश

आम्ही २०११मध्ये सचिन तेंडुलकरसाठी विश्वचषक जिंकलो, तसे तुम्ही यावेळी विराट कोहलीसाठी जिंका, अशा शब्दांत माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने भारताला शुभेच्छा दिल्या.

“सचिन निवृत्त झाल्यानंतर कोहलीने त्याची जागा घेतली आहे, असे आपण निश्चित म्हणू शकतो. गेल्या १२ वर्षांत कोहलीने भारतासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. कदाचित हा त्याचा शेवटचा विश्वचषक ठरू शकतो. त्यामुळे भारताने कोहलीसाठी विश्वचषक जिंकावा,” असे सेहवाग म्हणाला.

“कोहलीने ज्याप्रकारे त्याचा खेळ विकसित केला. तसेच तो दडपणाखाली ज्याप्रकारे कामगिरी उंचावतो, ते कौतुकास्पद आहे. अशा स्थितीतच खेळाडूचा दर्जा सिद्ध होतो. कोहली यंदा विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या तिघांत नक्कीच असेल,” असेही सेहवागने सांगितले.

या चार संघांत उपांत्य फेरीचे सामने

सेहवागच्या मते भारत, पाकिस्तान, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया हे चार संघ उपांत्य फेरी गाठतील. “ऑस्ट्रेलिया व इंग्लंडचे खेळाडू भारतीय खेळपट्ट्यांवर चांगल्याप्रकारे खेळू शकतील. तसेच भारत नक्कीच उपांत्य फेरी गाठेल. पाकिस्तानलाही अशाप्रकारच्या वातावरण व खेळपट्ट्यांची सवय असल्याने ते प्रामुख्याने गोलंदाजीच्या बळावर उपांत्य फेरीत प्रवेश करतील,” असे सेहवागने आवर्जून नमूद केले. श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरननेसुद्धा याच चार संघांची उपांत्य फेरीसाठी निवड केली.

logo
marathi.freepressjournal.in