अखिल भारतीय स्नूकर ओपन स्पर्धेची विजयी सुरुवात

अन्य लढतीत तन्मय जतकर आणि सिद‍्धांत फटे यांनी अनुक्रमे चुरशीच्या लढतीत विजय मिळवले
अखिल भारतीय स्नूकर ओपन स्पर्धेची विजयी सुरुवात

नॅशनल स्पोर्ट्स क्‍लब ऑफ इंडिया (एनएससीआय) आयोजित एनएससीआय अखिल भारतीय स्नूकर ओपन (बॉल्कलाइन) स्पर्धेच्या फेज वनमध्ये रिषभ कुमार आणि अनुराग बगरी विजयी सुरुवात केली.

कुमारने 1-2 अशा पिछाडीवरून पर्सी पटेलवर ३-२ (५४-४१, ५६-३३, ४७-५६, ५०-५६, ४८-३६) अशी मात केली. बगरीने आक्रमक खेळ करताना अविनाश पटेलचा ३-० (७०-११, ८३-३६, ६१-११) असा धुव्वा उडविला. अन्य लढतीत तन्मय जतकर आणि सिद‍्धांत फटे यांनी अनुक्रमे चुरशीच्या लढतीत विजय मिळवले. तन्मयने रोहन जैनचा ३-२ (५६-४८, ४१-५२, ४१-३५, २८-५९, ५८-५) असा, तर सिध्दांतने अनिल सहानीचा त्याच ३-२ अशा फरकाने (७१-६४, ५७-२३, ४२-५८, ५०-५८, ६३-१९) पराभव केला.

संक्षिप्त निकाल

आकाश रामटेके विजयी वि. प्रमोद शाह, तन्मय जतकर विजयी वि. रोहन जैन, सिद‍्धांत सिध्दांत फटे विजयी वि. अनिल सहानी, मनोज नंदवानी विजयी वि. पुस्कर बियानी, रिषभ कुमार विजयी वि. पर्सी पटेल, अनुराग बगरी विजयी वि. अविनाश राजपाल, द्विमिधा ए. विजयी वि. गौरव पतंगे, विश्‍वजीत मोहन विजयी वि. सेल्वेन सॅम्युअल, हसन बदामी विजयी वि. दर्शन शाह, समय वाधवान विजयी वि. भौमिक पांचाल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in