महिला प्रीमियर क्रिकेट लीग :शबनिम, अमेलियामुळे मुंबईचा सलग दुसरा विजय

एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना गुजरातला २० षटकांत ९ बाद १२६ धावांपर्यंतच मजल मारता आली.
महिला प्रीमियर क्रिकेट लीग :शबनिम, अमेलियामुळे मुंबईचा सलग दुसरा विजय

बंगळुरू : वेगवान गोलंदाज शबनिम इस्माइल (१८ धावांत ३ बळी) आणि अष्टपैलू अमेलिया कर (१७ धावांत ४ बळी आणि ३१ धावा) यांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या बळावर मुंबई इंडियन्सने महिलांच्या प्रीमियर लीगमध्ये (डब्ल्यूपीएल) सलग दुसरा विजय नोंदवला. गतविजेत्या मुंबईने गुजरात जायंट्सचा ५ गडी आणि ११ चेंडू राखून पराभव केला.

एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना गुजरातला २० षटकांत ९ बाद १२६ धावांपर्यंतच मजल मारता आली. शबनिमने कर्णधार बेथ मूनी (२४), वेदा कृष्णमूर्ती (०) व हरलीन देओल (८) यांचे बळी मिळवले. कॅथरीन ब्रायस (नाबाद २५) व तनुजा कन्वर (२८) यांनी प्रतिकार केला.

त्यानंतर, कर्णधार हरमनप्रीत कौर (४१ चेंडूंत नाबाद ४६ धावा) आणि अमेलिया (२५ चेंडूंत ३१) यांनी चौथ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी रचल्याने मुंबईने १८.१ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत अग्रस्थानी झेप घेतली. अमेलिया सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली.

आजचा सामना

गुजरात जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

वेळ : सायं. ७.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ वाहिनी

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in