विश्वविजेती बॉक्सर निखतने प्रथमच सुवर्णपदक पटकाविले

पहिल्या फेरीत निखतने वर्चस्व गाजविले. सर्व पाच पंचांकडून तिने १० पैकी १० गुण मिळविले.
विश्वविजेती बॉक्सर निखतने प्रथमच सुवर्णपदक पटकाविले
Published on

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी दहाव्या दिवशी विश्वविजेती बॉक्सर निखत झरीनने रविवारी ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत उत्तर आयर्लंडच्या कॅरी मॅकनॉलचा ५-०ने पराभव करून सुवर्णपदक पटकाविले. राष्ट्रकुल स्पर्धेत निखतने प्रथमच भारताला पदक मिळवून दिले. निखतने तिच्यापेक्षा सात वर्ष वयाने मोठ्या असलेल्या खेळाडूला दमवत बाजी मारली.

पहिल्या फेरीत निखतने वर्चस्व गाजविले. सर्व पाच पंचांकडून तिने १० पैकी १० गुण मिळविले. दुसऱ्या फेरीतही निकालात निखतने बाजी मारली. तिसऱ्या फेरीत तिने सातत्य टिकवून ठेवले. ५१ किलो वजनी गटात आधी मेरी कोमने वर्चस्व गाजविले होते.

logo
marathi.freepressjournal.in