विश्वविजेती 'टीम इंडिया' मुंबईकडे रवाना, सायंकाळी मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम दरम्यान 'विक्ट्री परेड'

आज सायंकाळी मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमदरम्यान विश्वविजेत्या संघाची विक्ट्री परेड काढण्यात येणार आहे.
विश्वविजेती 'टीम इंडिया' मुंबईकडे रवाना, सायंकाळी मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम दरम्यान 'विक्ट्री परेड'
bcci
Published on

मुंबई: विश्वविजेती टीम इंडिया आज सकाळी मायदेशी परतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवास्थानावरून टीम इंडिया बसने दिल्ली एअरपोर्टवर पोहोचली आहे. रोहित अॅण्ड कंपनी विशेष चार्टर्ड विमानानं मुंबईला येणार आहेत. दुपारी चारच्या आसपास हा संघ मुंबई विमानतळावर पोहोचेल अशी माहिती आहे. त्यानंतर या संघाचं स्वागत होईल. त्यानंतर मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम विक्ट्री परेडमध्ये हे खेळाडू सहभागी होतील आणि नंतर वानखेडे स्टेडियमवर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

२००७ मध्ये टी-20 विश्वचषक जिंकला होता-

अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर टीम इंडियानं भारतीय क्रिकेट चाहत्यांना आनंद दिला. २०२४ टी २० विश्वचषक जिंकून टीम इंडियाने ११ वर्षांनंतर ICC ट्रॉफी जिंकली. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून रोहित अॅण्ड कंपनी T20 विश्वविजेती बनली. आता मायदेशी परतल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड कप ट्रॉफीसह खुल्या बसमधून मुंबईचा दौरा करणार आहे.. टीम इंडिया विशेष विमानानं बार्बाडोस येथून निघाली आणि आज सकाळी दिल्लीत पोहोचली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून टीम इंडिया मुंबईसाठी निघाली आहे. मुंबईमध्ये विश्वविजेती रोहित अॅण्ड कंपनी ओपन बस मधून विक्ट्री परेड निघणार असून वानखेडे स्टेडियमवर भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनी आणि कंपनीने २००७ मध्ये टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांचं मुंबईत मोठं स्वागत करण्यात आलं होतं.

१६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर जिंकला T20 विश्वचषक-

१६ वर्षांपूर्वी, जेव्हा टीम इंडियाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला T20 विश्वचषक जिंकला तेव्हा धोनीच्या संघाने मुंबईत ट्रॉफीसह बस परेड आयोजित केली होती. २००७ T20 विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत खेळला गेला, जिथे भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत करून ट्रॉफी जिंकली.

आज टीम इंडिया बार्बाडोसहून परतल्यानंतर दिल्लीहून मुंबईत येणार आहे. त्यानंतर इथं त्यांचं भव्य स्वागत करण्यात येणार आहे. खुल्या बसमधून विश्वविजेता संघ वर्ल्डकप ट्रॉफीसह प्रवास करेल. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in