जागतिक कंटेन्डर टेबल टेनिस स्पर्धा: श्रीजा उपांत्यपूर्व फेरीत; मनिकाचा मात्र पराभव

दक्षिण कोरियाच्या जिओन झीने अर्चनाला १३-११, ९-११, ११-६, ११-४ अशी धूळ चारली.
जागतिक कंटेन्डर टेबल टेनिस स्पर्धा: श्रीजा उपांत्यपूर्व फेरीत; मनिकाचा मात्र पराभव

म्हापसा (गोवा) : भारताच्या श्रीजा अकुलाने जागतिक टेबल टेनिस कंटेन्डर स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र अनुभवी मनिका बत्राचे आव्हान संपुष्टात आले. तसेच अर्चना कामतनेही स्पर्धेतून गाशा गुंडाळला.

गोवा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत श्रीजाने हाँगकाँगच्या होई केमला १२-१०, ८-११, ११-८, ११-८ असे चार गेममध्ये पराभूत केले. २५ वर्षीय श्रीजा क्रमवारीत ६६व्या, तर होई ३६व्या स्थानी आहे. २०२१मध्ये याच स्पर्धेत मी होईकडून पराभूत झाले होते. यावेळी मी अधिक तयारीसह कोर्टवर उतरली. दरम्यान, क्रमवारीत १३व्या स्थानी असलेल्या झिओन यांगने मनिकाला ९-११, १३-११, ११-७, ११-९ असे चार गेममध्ये पिछाडीवरून नमवले. दक्षिण कोरियाच्या जिओन झीने अर्चनाला १३-११, ९-११, ११-६, ११-४ अशी धूळ चारली. रविवारी उपांत्य व अंतिम फेरीचे सामने खेळवण्यात येतील.

logo
marathi.freepressjournal.in