World Cup 2023 : १५ ऑक्टोबरला होणाऱ्या भारत-पाक सामन्याच्या तारखेत बदल ; 'या' तारखेला होण्याची शक्यता

सुरक्षा यंत्रणांनी बीसीसीआयला भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलण्याची विनंती केली होती.
World Cup 2023 : १५ ऑक्टोबरला होणाऱ्या भारत-पाक सामन्याच्या तारखेत बदल ; 'या' तारखेला होण्याची शक्यता

भारतात ५ ऑक्टोंबर पासून सुरु होणाऱ्या वन डे वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा आधी १५ ऑक्टोबर रोजी होणार होता. मात्र, बीसीसीआयने सुरक्षा यंत्रणांच्या विनंतीवरुन या सामन्याच्या तारखेत बदल केला आहे. स्पोर्ट्स तकने दिलेल्या माहितीनुसार आता भारत-पाकिस्तान सामना हा एक दिवस आधी म्हणजे १४ ऑक्टोबर रोजी खेळवला जाण्याची शक्यता आहे.

मागच्या महिन्यात बीसीसीआयने वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले होते. या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्याकडील सामना १५ ऑक्टोबरला गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होता. मात्र, सुरक्षा यंत्रणांनी बीसीसीआयला या सामन्याची तारीख बदलण्याची विनंती केली होती. आधी हा सामना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी होता. नवरात्रीत गुजरातमध्ये गरबा खेळण्यासाठी मोठी गर्दी होते. यावेळी हा सामना खेळवला गेल्यास सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणांनी या सामन्याची तारीख बदलण्याची विनंती केली आहे.

बीसीसीआयने देखील सुरक्षा यंत्रांनी केल्या विनंतीवरु तसंच गांभीर्य लक्षात घेवून तात्काळ बैठक घेतली. या बैठकीत सामन्याची तारीख बदलण्यात येणार यावर शिक्कामोर्तब केलं. या सामन्याची तारीख जरी बदलली असली तरी हा सामना मात्र, नरेंद्र मोदी स्टेडियमवरचं होणार आहे.

हा सामना कधी होणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नसली नाही, मात्र, हा सामना घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी म्हणजे १४ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. तसंच आणखी काही सामन्याची तारीख बदलली जाण्याची शक्यता आहे. याबाबतची घोषणा बीसीसीयाकडून आज(३१ जुलै) केली जाण्यची दाट शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in