WPL 2023 : बॅटवर धोनीचे नाव लिहीत झळकावले अर्धशतक; 'ही' क्रिकेटपटू कोण?

महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL 2023) रविवारी झालेल्या यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्या सामन्यांमध्ये एका महिला फलंदाजाने वेधले सर्वांचे लक्ष
WPL 2023 : बॅटवर धोनीचे नाव लिहीत झळकावले अर्धशतक; 'ही' क्रिकेटपटू कोण?

काल रविवारी महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL 2023) यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात रोमहर्षक पाहायला मिळाला. या सामन्यात यूपी वारियर्स ३ विकेट्सने विजय मिळवला. गुजरात जायंट्सने १७० धावांचे लक्ष दिले होते. यूपी वारियर्सने पहिले ३ विकेट्स लवकर गमावले. मात्र, त्यानंतर आलेल्या किरण नवगिरे आणि ग्रेस हॅरिसच्या अर्धशतकी खेळीने युपी वॉरियर्सला रोमहर्षक विजय मिळवून दिला. मुळची सोलापूरची असलेली किरण नवगिरे (Kiran Navgire) आणखी एका कारणामुळे चर्चेत आली, ते म्हणजे तिच्या बॅटवर MSD 07 असे लिहिले होते. या बॅटची चांगलीच चर्चा झाली.

यूपी वॉरियर्सची फलंदाज किरण नवगिरेने ४३ चेंडूंमध्ये ५३ धावांची धमाकेदार खेळी केली. यावेळी एका कॅमेऱ्यामध्ये तिच्या बॅटवर लिहिलेले MSD 07 ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने अनेकदा भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची खूप मोठी चाहती असल्याचे सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरण नवगिरेला स्पॉन्सर मिळालेला नाही. म्हणून तिच्या बॅटवर कोणत्याही कंपनीचा प्रमोशन टॅग नसून तिने धोनीचे नाव बॅटवर लिहिणे पसंत केले.

किरण नवगिरे ही सोलापूरची क्रिकेटपटू आहे. ती सध्या महिला प्रीमियर लीगमध्ये उत्तर प्रदेश वॉरियर्सकडून खेळते. तिला ३० लाखांच्या मूळ किमतीमध्ये संघात समाविष्ट करून घेतले होते. तसेच, ती देशांतर्गत क्रिकेटमध्ये ती नागालँड संघाकडून खेळते. महिला प्रीमियर लीगच्या सुरुवातील वतीने मुलाखतीमध्ये सांगितले होते की, "२०११मध्ये महेंद्रसिंग धोनीने भारताला विश्वचषक जिंकून दिला होता. त्या दिवसापासूनच मी क्रिकेट खेळण्याचे निश्चित केले होते."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in