महिला प्रीमियर लीगचा थरार आता वानखेडेवर; ब्रेबॉर्न स्टेडियमऐवजी वानखेडेची निवड; २६ जानेवारीपासून ११ सामने रंगणार

WPL 2027: महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) पाचव्या पर्वातील मुंबई टप्प्याचे सामने आता मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहेत. यापूर्वी हे सामने क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय)च्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर आयोजित करण्याचे नियोजन होते.
महिला प्रीमियर लीगचा थरार आता वानखेडेवर; ब्रेबॉर्न स्टेडियमऐवजी वानखेडेची निवड; २६ जानेवारीपासून ११ सामने रंगणार
महिला प्रीमियर लीगचा थरार आता वानखेडेवर; ब्रेबॉर्न स्टेडियमऐवजी वानखेडेची निवड; २६ जानेवारीपासून ११ सामने रंगणारX
Published on: 

मुंबई : महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) पाचव्या पर्वातील मुंबई टप्प्याचे सामने आता मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहेत. यापूर्वी हे सामने क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय)च्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर आयोजित करण्याचे नियोजन होते. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) विनंतीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्थळबदलाचा निर्णय घेतला आहे. रविवारी बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली.

१४ जानेवारीपासून स्पर्धेला सुरुवात

महिला प्रीमियर लीग २०२७ चे आयोजन १४ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात येणार आहे. स्पर्धेचे सामने वडोदरा आणि मुंबई या दोन शहरांत खेळविले जातील. पहिला टप्पा १४ ते २४ जानेवारीदरम्यान वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर पार पडेल. त्यानंतर २६ जानेवारीपासून मुंबईतील दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल. अंतिम सामना ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

मुंबईतील दुसऱ्या टप्प्यात १२ ते २० क्रमांकाचे साखळी सामने, एलिमिनेटर आणि अंतिम सामना असे एकूण ११ सामने खेळविण्यात येणार आहेत. हे सर्व सामने वानखेडे स्टेडियमवर होतील. विशेष म्हणजे, सामन्यांच्या तारखा आणि मूळ वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

खेळपट्ट्यांसाठी बदल

ब्रेबॉर्न स्टेडियमवर १४ फेब्रुवारीपासून पहिल्या आयसीसी महिला टी-२० चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. डब्ल्यूपीएलचा अंतिम सामना ७ फेब्रुवारीला झाल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी खेळपट्ट्यांच्या देखभालीसाठी पुरेसा कालावधी मिळणार नव्हता. त्यानुसार वानखेडे स्टेडियमवर सामने आयोजित करण्यास मंजुरी दिली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)