
महिला प्रीमियर लीग २०२३च्या (WPL Auction 2023) लिलावाला सुरुवात झाली असून सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजारा याकडे खिळल्या आहेत. लिलावाची सर्वात पहिलीच बोली भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधानावर (Smriti Mandhana) लागली. तिच्यासाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि आरसीबीमध्ये (RCB) चांगलेच युद्ध रंगले होते. ५० लाखांवरून सुरु झालेल्या या बोलीमध्ये अखेर आरसीबीने बाजी मारली. तिला ३ कोटी ४० लाख किमंत मोजून आरसीबीने आपल्या संघात समावेश करून घेतला.
महिला प्रीमियर लीगच्या या लिलावामध्ये पाचही संघांचे लक्ष हे स्मृती मंधानावर होते. कारण, जागतिक महिला क्रिकेटमध्ये तिची कामगिरी अविश्वसनीय राहिली आहे. ती फक्त सलामीवीर म्हणूनच नाही तर कर्णधार म्हणूनही आपली भूमिका बजावू शकते. ती सध्या भारतीय महिला क्रिकेट टी-२० संघाची उपकर्णधार आहे. तसेच, तिने महिला बिग बॅश लीग आणि वूमन हंड्रेड लीगमध्येही उत्तम कामगिरी केली आहे.