मुंबई इंडियन्सची ब्रंट ठरली WPL ची पहिली शतकवीर; बंगळुरूला नमवल्यामुळे आव्हान कायम; रिचाची एकाकी झुंज

मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या नॅट शीव्हर ब्रंटने सोमवारी रात्री महिलांच्या प्रीमियर लीगमधील (डब्ल्यूपीएल) पहिले शतक साकारले. तिने ५७ चेंडूंत नाबाद १०० धावा फटकावल्या. त्यामुळे मुंबईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर १५ धावांनी मात केली.
मुंबई इंडियन्सची ब्रंट ठरली WPL ची पहिली शतकवीर
मुंबई इंडियन्सची ब्रंट ठरली WPL ची पहिली शतकवीरPhoto : X
Published on

मुंबई : मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या नॅट शीव्हर ब्रंटने सोमवारी रात्री महिलांच्या प्रीमियर लीगमधील (डब्ल्यूपीएल) पहिले शतक साकारले. तिने ५७ चेंडूंत नाबाद १०० धावा फटकावल्या. त्यामुळे मुंबईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर १५ धावांनी मात केली. बंगळुरूच्या रिचा घोषची (५० चेंडूंत ९० धावा) एकाकी झुंज अपयशी ठरली. या विजयामुळे मुंबईने स्पर्धेतील आव्हान कायम राखले, तर बंगळुरूला थेट अंतिम फेरी गाठण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दरम्यान, यंदा ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या काळात चाहत्यांना डब्ल्यूपीएलचा थरार अनुभवायला मिळत आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमसह बडोदा येथील कोटांबी स्टेडियमवर यंदा दोन टप्प्यांत डब्ल्यूपीएलचे आयोजन करण्यात येणार आहे. ९ ते १७ जानेवारी दरम्यानचे ११ सामने नवी मुंबई येथे, तर १९ जानेवारी ते ५ फेब्रुवारीपर्यंतच्या उर्वरित ११ लढती बडोदा येथे होतील. जून-जुलै महिन्यात महिलांची टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्या दृष्टीने ही डब्ल्यूपीएल निर्णायक ठरेल.

२ नोव्हेंबर, २०२५ रोजी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने विश्वचषक उंचावला. त्यांनी अनुक्रमे ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघांना उपांत्य व अंतिम सामन्यात धूळ चारली. या ऐतिहासिक यशानंतर महिला क्रिकेटचे रूप पालटले असून चोहीकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. हरमनप्रीतच्या संघाने केलेल्या कामगिरीमुळे असंख्य महिलांना प्रेरणा मिळाली आहे. आता डब्ल्यूपीएलमध्ये युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची आणखी एक संधी मिळेल.

आतापर्यंत महिलांच्या आयपीएलचे तीन हंगाम झाले असून त्यापैकी २०२३ व २०२५मध्ये हरमनप्रीतच्या नेतृत्वात मुंबईने, तर २०२४मध्ये स्मृती मानधनाच्या नेतृत्वात बंगळुरूने विजेतेपद पटकावले होते. यापूर्वी दोन हंगामांमध्ये मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर अंतिम सामना झाला, तर एकदा नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर महाअंतिम लढत रंगली.

logo
marathi.freepressjournal.in