अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईचा पराभव, बंगळुरू अंतिम फेरीत

खेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या एलिमिनेटर लढतीत स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर ५ धावांनी सरशी साधली.
अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईचा पराभव, बंगळुरू अंतिम फेरीत

नवी दिल्ली : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या एलिमिनेटर लढतीत स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर ५ धावांनी सरशी साधली. याबरोबरच बंगळुरूने प्रथमच महिलांच्या प्रीमियर लीगची (डब्ल्यूपीएल) अंतिम फेरी गाठली. तर हरमनप्रीत कौरच्या मुंबईला सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारण्यात अपयश आले.

बंगळुरूने दिलेल्या १३६ धावांचा पाठलाग करताना मुंबईला २० षटकांत ६ बाद १३० धावांपर्यंतच मजल मारता आली. १२ चेंडूंत १६ धावांची गरज असताना फिरकीपटू सोफी मोलिनीक्सने फक्त ४ धावा देत एक गडी बाद केला. त्यानंतर अखेरच्या षटकात १२ धावांचा बचाव करताना लेगस्पिनर आशा शोबनाने फक्त ६ धावा दिल्या व पूजा वस्त्रकारला बाद केले. त्यामुळे बंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. मुंबईकडून हरमनप्रीत (३३), अमेलिया कर (नाबाद २७) यांनी एकाकी झुंज दिली.

प्रथम फलंदाजी करताना एलिस पेरीच्या ५० चेंडूंतील ६६ धावांमुळे बंगळुरूने ६ बाद १३५ धावा केल्या. पेरीने गोलंदाजीतही एक बळी मिळवला. आता रविवारी बंगळुरूची अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सशी गाठ पडेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in