ऑलिम्पिक विजेत्या बजरंग पुनियाने कुस्ती महासंघावर केले 'हे' गंभीर आरोप; म्हणाला...

कुस्ती महासंघाचे प्रमुख बृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले
ऑलिम्पिक विजेत्या बजरंग पुनियाने कुस्ती महासंघावर केले 'हे' गंभीर आरोप; म्हणाला...

भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) प्रमुख बृजभूषण सिंह आणि इतर प्रशिक्षकांनी अल्पवयीन महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप काही भारतीय कुस्तीपटूंनी केले आहेत. याप्रकरणी ७ महिला खेळाडूंनी कुस्ती महासंघ आणि ब्रृजभूषण सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. यावेळी अनेक बड्या खेळाडूंनी त्यांच्याविरोधात वारंवार आंदोलन केले आहे. तरीही त्यांच्यावर कारवाई न झाल्याने आता सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. अशामध्ये आंदोलन करणाऱ्या ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंपैकी बजरंग पुनियाने आज पुन्हा एकदा कुस्ती महासंघावर गंभीर आरोप केले आहेत.

ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला की, "भारतीय कुस्ती महासंघाच्या प्रतिनिधींनी तक्रारदार महिला खेळाडूंना तक्रार मागे घेण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडून धमकीदेखील देण्यात आली आहे." जंतरमंतर मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान त्याने हे गंभीर आरोप केले. तो म्हणाला की, "त्यांच्याकडून आंदोलनाकर्त्या खेळाडूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे," असा दावा त्याने केला. दरम्यान, "बृजभूषण सिंह यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा" अशी मागणी या खेळाडूंनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in