कुस्तीपटूंनी बृजभूषण यांचे आव्हान स्विकारले; सर्वोच्य न्यायालयामार्फत लाईव्ह नार्को टेस्ट करण्याची ठेवली अट

यावेळी बोलताना कुस्तीपटू म्हणाले की, ज्या व्यक्तीवर 7 मुलींच्या लैंगिक शोषणाचे आरोप आहेत, त्याला हिरो बनवू नका.
कुस्तीपटूंनी बृजभूषण यांचे आव्हान स्विकारले; सर्वोच्य न्यायालयामार्फत लाईव्ह नार्को टेस्ट करण्याची ठेवली अट

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आणि कुस्ती महासंघात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत कुस्तीपंटू दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलनास बसले आहेत. बृजभूषण यांनी फेसबुर पोस्ट करत आपण नोर्को टेस्ट करायला तयार असल्याचे सांगितले होते. पण यावेळी बृजभूषण यांनी कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांचीही नार्को टेस्ट करण्याची अट घातली होती. यावर कुस्तीपटू बजरंग पुनियाने बृजभूषण याना प्रत्युत्तर देत त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते तर आता बोलत आहेत, आम्ही यापुर्वीच सांगितले होते, असे म्हणत बजरंग पुनियाने नार्को टेस्टसाठी तयार असल्याचे सांगितले आहे. मात्र, त्याने देखील यासाठी एक अट घातली आहे.

कुस्ती महासंघातील घोटाळे उघड करायचे असती तर मी नार्को टेस्ट करायला तयार आहे. पण विनोद तोमर महिला कुस्तीपटूंचे प्रशिक्षक जितेंद्र, फिजिओ धीरेंद्र प्रताप यांचीही नोर्को टेस्ट व्हायला हवी, असे बजरंग पुनियाने म्हटले आहे. तसेच ज्या मुली गेल्या कित्येक दिवसापासून बृजभूषण यांच्यावर आरोप करत आहेत. त्या आधिपासूनच आमची नार्को टेस्ट करा म्हणून सांगत आहेत. त्या नार्को टेस्ट करायला तयार आहेत. असे देखील त्याने म्हटले आहे.

आरोपीला हिरो बनवू नका

कुस्तीपटुंच्या झालेल्या पत्रकार परिषदेत कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांनी बृजभूषण सिंह यांच्यावर केलेल्या लैंगिक छळांचा पुनरुच्चार केला. यावेळी ते म्हणाले की, "काल बृजभूषण यांनी नार्को टेस्ट बाबत वक्तव्य केले होते. सर्वोच्य न्यायालयामार्फत नार्को टेस्ट करा. संपुर्ण देश लाईव्ह पाहील." असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी तक्रारदार 7 मुलींचीही नार्को टेस्ट व्हायला हवी, आम्ही टेस्टला सामोरे जायला तयार आहोत. दोषी आढळल्यास कारवाई करावी, असे देखील बजरंग पुनिया याने म्हटले आहे. बृजभूषण हे 500 किमी दूर बसून काहीही बोलत आहेत. पोलिसांकडून आमची दिशाभूल सुरु आहे. असे देखील त्याने म्हटले आहे. यावेळी बोलताना कुस्तीपटू म्हणाले की, ज्या व्यक्तीवर 7 मुलींच्या लैंगिक शोषणाचे आरोप आहेत, त्याला हिरो बनवू नका. तो दोषी आहे.

नार्को टेस्ट लाईव्ह करा - कुस्तीपटू

नार्को टेस्ट विषयी बोलताना कुस्तीपटू विनेश फोगाट म्हणाली की, "त्यांनी माझ्यासह बजरंगच नाव घेतले आहे. तक्रार करणाऱ्या सगळ्या मुली या नार्को टेस्टसाठी तयार आहेत. त्यांनी केल हे संपुर्ण देश बघेल. नार्को टेस्ट ही लाईव्ह व्हायला हवी." तसेच मंगळवारी (23 मे) रोजी इंडिया गेटवर येऊन आम्हाला पाठींबा द्या, असे आवाहन कुस्तीपटू साक्षी मलिकने यावेळी केले.

नेमके काय म्हणाले होते बृजभुषण

बृजभूषण म्हणाले की, "बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट हे त्यांची नार्को टेस्ट करायला तयार असतील, तर पत्रकारांना बोलावून त्याबाबत घोषणा करा. मी वचन देतो की, मी त्यासाठी तयार आहे. मी माझ्या म्हणण्यावर ठाम असून यापुढे ठाम राहीन हे मी माझ्या देशवासीयांना वचन देतो." अशी पोस्ट बृजभूषण यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन पोस्ट केली होती.

गेल्या 28 दिवसांपासून कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु

गेल्या 28 दिवसांपासून कुस्तीपटूंचे दिल्लीतील जंतर- मंतर मैदानावर निदर्शने करत आंदोलने सुरु आहेत. कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांना अटक करण्याची मागणी करत आहेत. बृजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटुंचे लैंगिक शोषण तसेत कुस्ती महासंघात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप कुस्तीपटूंनी केले आहेत. कुस्तीपटूंच्या आरोपांवरुन दिल्ली पोलिसांनी बृजभूषण यांच्यावर दोन गु्न्हे दाखल केले असून त्यांचा तपास सुरु आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in