नवी दिल्ली : बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट या कुस्तीपटूंनी शुक्रवारी पुन्हा बंडाचा पवित्रा पुकारताना न्यायालयात धाव घेतली. भारतीय कुस्ती महासंघाने राष्ट्रीय निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चाचणी थांबवावी म्हणून या कुस्तीपटूंनी दिल्ली न्यायालय गाठले आहे.
बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आल्यावर त्यांचे निकटवर्तीय संजय सिंह महासंघाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. तसेच जागतिक महासंघाने ही बंदी उठवल्यानंतर आता संजय सिंह यांच्या महासंघाने २०२४च्या आशियाई पात्रता ऑलिम्पिक स्पर्धेसाठी राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले आहे. मात्र याला विरोध दर्शवतानाच साक्षी, विनेश व बजरंग यांनी बंड पुकारले आहे. तसेच केंद्र शासनाने या प्रकरणात लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. दिल्ली येथे १० व ११ मार्च रोजी निवड चाचणी स्पर्धा होणे अपेक्षित आहे. मात्र आता या कुस्तीपटूंच्या विरोधानंतर ही स्पर्धा होणार का, हे पाहणे रंजक ठरेल.