ऑलिम्पिक पदक विजेत्यांना का आलीय रस्त्यावर उतरण्याची वेळ? कोण आहे बृजभूषण सिंह?

दिल्लीतील जंतरमंतरवर ऑलिम्पिक पदक विजेत्यांनी, जागतिक कुस्तीपटूंनी आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत?
ऑलिम्पिक पदक विजेत्यांना का आलीय रस्त्यावर उतरण्याची वेळ? कोण आहे बृजभूषण सिंह?

दिल्लीतील जंतरमंतरवर ऑलिम्पिक पदक विजेत्यांना, जागतिक कुस्तीपटूंना आंदोलन करण्याची वेळ आली आहे. नेहमी जागतिक स्तरावर भारताची मान उंचावणाऱ्या कुस्तीपटूंना अखेर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. याचे कारण म्हणजे, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह. भारतीय कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लैंगिक छळासह इतर गंभीर आरोप केले आहेत. कुस्तीपटूंनी पुकारलेल्या या आंदोलनामध्ये बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक यांच्यासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सहभागी झाले आहेत.

देशासाठी जागतिक पातळीवर अनेक पदके मिळवून देणारे कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक यांच्यासह अनेक खेळाडूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात हे आंदोलन सुरु केले. दरम्यान, सरकारने याची दखल घेत कुस्ती महासंघाला ७२ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. तसेच, आज कुस्तीपटूंसोबत चर्चादेखील केली जाणार आहे.

कुस्तीपटू आणि भाजपची नेता बबिता फोगट हीनेदेखील जंतरमंतरवर हजेरी लावली. तसेच, आंदोलन करणारे कुस्तीपटू आणि सरकारमधली दुवा म्हणून ती भूमिका बजावत आहे.

कोण आहेत ब्रिजभूषण सिंह?

ब्रिजभूषण सिंह हे भाजपचे नेते असून ते अनेक वादांमध्ये अडकलेले आहेत. त्यांनी राज ठाकरेंनी माफी न मागितल्यास अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही अशी जाहीर धमकी दिली होती. दरम्यान, त्यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना म्हंटले की, "हे सगळे आरोप चुकीचे आहेत. ज्यांनी आरोप केले आहेत, त्यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागलेली आहे. काही हेतूने ते आरोप करत आहेत," असा दावा त्यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in