राष्ट्रकुल तलवारबाजी भारताच्या 'या' महिला खेळाडूने पटकावले अजिंक्यपद

भवानी देवी कैरो येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्या फेरीनंतर बाहेर पडली होती.
राष्ट्रकुल तलवारबाजी भारताच्या 'या' महिला खेळाडूने पटकावले अजिंक्यपद

भारताची आघाडीची तलवारबाज भवानी देवीने राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. तिने गेल्यावेळीदेखील सुवर्णपदक मिळविले होते.

जागतिक क्रमवारीत ४२व्या स्थानावर असलेल्या भवानी देवीने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या व्हेरोनिका व्हेसिलेवाचा १५-१० ने पराभव केला. भवानी देवीने यंदाचा हंगाम इस्तंबुल येथील वर्ल्डकपपासून सुरू केला होता; मात्र तिला २३व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर भवानी देवी कैरो येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्या फेरीनंतर बाहेर पडली होती. आता राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा ही तिची या वर्षातील दहावी स्पर्धा होती.

दरम्यान, राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी भवानी देवी म्हणाली की, ‘अंतिम सामना खूप अवघड होता. मला भारतासाठी दुसरे सुवर्णपदक जिंकल्याचा आनंद आहे. यंदाचे वर्ष माझ्यासाठी चांगले राहिले आहे. मला ही कामगिरी पुढेही सुरू ठेवायची आहे. मला भारतातून मिळणारा पाठिंबा मोठा आहे.’

भारतीय तलवारबाजी संघटनेचे सचिव राजीव मेहता यांनी सांगितले की, ‘भवानी देवी ही भारतातील प्रत्येक तलवारबाजी करणाऱ्या खेळाडूसाठी प्रेरणास्थान आहे. तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अनेक तरुण खेळाडू जागतिक स्तरावर आपल्या कामगिरीचा ठसा उमटविण्याचे स्वप्न पाहत आहेत.’

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in