यशस्वी जैस्वालचे सलग दुसरे शतक; न्यूझीलंड 'अ' संघाविरुद्ध १०२ धावांची आक्रमक खेळी

भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी दमदार फलंदाजी करत सलग दुसरे शतक झळकावले. न्यूझीलंड 'अ'विरुद्धच्या तिसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी त्याने १३८ चेंडूंत १०२ धावांची आक्रमक खेळी केली.
यशस्वी जैस्वालचे सलग दुसरे शतक; न्यूझीलंड 'अ' संघाविरुद्ध १०२ धावांची आक्रमक खेळी
यशस्वी जैस्वालचे सलग दुसरे शतक; न्यूझीलंड 'अ' संघाविरुद्ध १०२ धावांची आक्रमक खेळी
Published on: 

लिंकन: भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी दमदार फलंदाजी करत सलग दुसरे शतक झळकावले. न्यूझीलंड 'अ'विरुद्धच्या तिसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी त्याने १३८ चेंडूंत १०२ धावांची आक्रमक खेळी केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे त्याचे सलग दुसरे शतक ठरले. त्याच्या खेळीच्या जोरावर भारत 'अ' संघाने पहिल्या दिवसअखेर २ बाद २२७ धावा केल्या.

या दौऱ्यातील पहिल्या लाल चेंडूच्या सामन्यानंतर जैस्वालच्या फॉर्मबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, सलग दोन शतके झळकावत त्याने १९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी चांगली लय मिळवली आहे.

बर्ट सटक्लिफ ओव्हल मैदानावर पावसामुळे दिवसाचा खेळ ७० व्या षटकात थांबवण्यात आला. खेळपट्टीवर हिरवळ असतानाही भारतीय फलंदाजांनी सहज फलंदाजी केली. दिवसअखेर साई सुदर्शन २०५ चेंडूंत ७७ धावांवर, तर कर्णधार ध्रुव जुरेल २४ चेंडूंत १२ धावांवर नाबाद होते.

या सामन्याला विशेष महत्त्व आहे. जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि प्रसिद्ध कृष्णा हे तीन प्रमुख भारतीय खेळाडू कसोटी मालिकेच्या तयारीचा भाग म्हणून भारत 'अ'कडून या अंतिम सामन्यात खेळत आहेत.

पहिल्या दिवसाचा बहुतांश काळ जैस्वालच्या नावावर राहिला. त्याने न्यूझीलंड 'अ'च्या वेगवान गोलंदाजांचा समाचार घेत मैदानाच्या चहूबाजूंनी फटकेबाजी केली. कट, पुल आणि कव्हर ड्राइव्हच्या आकर्षक फटक्यांनी त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. ब्रेट रँडेलच्या गोलंदाजीवर सुरेख कव्हर ड्राइव्ह मारत त्याने अर्धशतक पूर्ण केले.

जारोड मॅकेच्या गोलंदाजीवर त्याने दोन वेळा सलग तीन चौकार ठोकले. ५४ धावांवर असताना त्याचा झेल सुटल्याचा फायदाही त्याने उठवला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)