मुंबई : हैदराबाद येथे गुरुवार, १ फेब्रुवारीपासून ४९व्या कुमार-कुमारी गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी याशिका पुजारी आणि रजत सिंग या दोन्ही मुंबई उपनगरच्या खेळाडूंकडे महाराष्ट्राच्या संघांचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
१ ते ४ फेब्रुवारीदरम्यान हैदराबाद येथील कसानी कृष्णा मुदियाल अकादमीच्या मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने प्रत्येकी १२ खेळाडूंचा चमू जाहीर केला आहे. या संघांचा ठाणे येथील येऊर येथे जोरदार सराव करून घेण्यात आला.
महाराष्ट्राचे संघ
कुमार : रजत सिंग (कर्णधार), जयेश महाजन, अनुज गावडे, वरुण खंडाळे, अतुल जाधव, साहिल पाटील, सिद्धार्थ सौतोने, वैभव खाडे, विक्रम परमार, यश निंबाळकर, ओम कुडाळे, अभिराज पवार. प्रशिक्षक : शंतनू पांडव
कुमारी : याशिका पुजारी (कर्णधार), झुवेरिया पिंजारी, भूमिका गोरे, ऋतुजा अवघडी, अर्चना सरेले, समृद्धी मोहिते, निकिता लंगोटे, नयना झा, ऋतुजा आंबी, हरजित कौर संधू, वैभवी जाधव, अनिशा निकम. प्रशिक्षक : मालोजी भोसले.