युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा: उदयसह भारताचे चार खेळाडू आयसीसीच्या सर्वोत्तम संघात

उदयने भारताचे अंतिम फेरीपर्यंत अपराजित नेतृत्व करतानाच स्पर्धेत ७ सामन्यांत सर्वाधिक ३९७ धावा केल्या.
युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा: उदयसह भारताचे चार खेळाडू आयसीसीच्या सर्वोत्तम संघात

बेनोनी : उदय सहारनसह भारताच्या चार जणांचा आयसीसीच्या युवा विश्वचषकातील सर्वोत्तम ११ खेळाडूंच्या संघात समावेश करण्यात आला आहे. रविवारी झालेल्या आयसीसी युवा विश्वचषकाच्या (१९ वर्षांखालील) अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला ७९ धावांनी धूळ चारली.

भारताचा कर्णधारह उदयसह मुंबईकर फलंदाज मुशीर खान, बीडचा सचिन धस आणि डावखुरा फिरकीपटू सौमी पांडे यांनाही आयसीसीच्या संघात स्थान लाभले आहे. ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार ह्युज वेबजेनकडेच या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. आयसीसीचे पदाधिकारी, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार व समालोचक यांची मते जाणून घेत या संघाची निवड केली जाते.

उदयने भारताचे अंतिम फेरीपर्यंत अपराजित नेतृत्व करतानाच स्पर्धेत ७ सामन्यांत सर्वाधिक ३९७ धावा केल्या. मुशीरने दोन शतकांसह दुसऱ्या क्रमांकाच्या ३६० धावा केल्या. सचिनने ३०३ धावा फटकावल्या. सौमीने भारताकडून सर्वाधिक १८ बळी पटकावले. या संघात ऑस्ट्रेलियाच्या तीन, आफ्रिकेच्या दोन, तर वेस्ट इंडिज व पाकिस्तानच्या प्रत्येकी एका खेळाडूला स्थान लाभले.

आयसीसीचा संघ

ह्युज वेबजेन (कर्णधार), हॅरी डिक्सन, लुहान प्रिटोरियस, मुशीर खान, उदय सहारन, सचिन धस, नॅथन एडवर्ड्स, कॅलम विल्डर, उबेद शाह, क्वेना मफका, सौमी पांडे. १२वा खेळाडू : जॅमी डंक

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in