झिम्बाब्वेचा स्टार फलंदाजाने पटकाविला ‘प्लेअर ऑफ द मंथ’पुरस्कार

३६ वर्षीय सिकंदरने ऑगस्ट महिन्यात तीन वन-डे शतके झळकाविली आहेत.
झिम्बाब्वेचा स्टार फलंदाजाने पटकाविला ‘प्लेअर ऑफ द मंथ’पुरस्कार

झिम्बाब्वेचा स्टार फलंदाज सिकंदर रझाने गेल्या महिन्यात केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर ऑगस्ट २०२२चा आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ हा पुरस्कार पटकाविला. विशेष म्हणजे, आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ मिळवणारा सिकंदर रझा हा झिम्बाब्वेचा पहिला खेळाडू ठरला. त्याने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आणि न्यूझीलंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज मिशेल सँटनरला मागे टाकत हा पुरस्कार मिळविला.

३६ वर्षीय सिकंदरने ऑगस्ट महिन्यात तीन वन-डे शतके झळकाविली आहेत. त्याने बांगलादेशविरूद्ध दोन आणि भारताविरुद्ध एक शतक ठोकले. तिसऱ्या वन-डे सामन्यात झिम्बाब्वेला मिळालेल्या २९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सिकंदर रझाने ९५ चेंडूंत ११५ धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळे भारत सामना गमावण्याची स्थिती निर्माण झाली होती.

सिकंदर रझाने जागतिक स्तरावरील अव्वल गोलंदाजांसमोर चमकदार फलंदाजी करत स्वतःला सिद्ध केले. यामुळेच आयसीसीने त्याच्या कामगिरीची दखल घेत त्याला ऑगस्ट महिन्यातील प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार देऊन त्याचा सन्मान केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in