भिवंडीत १ किलो गांजा जप्त; पोलिसांची कारवाई

शांतीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
भिवंडीत १ किलो गांजा जप्त; पोलिसांची कारवाई

भिवंडी : भिवंडीतील शांतीनगर पोलिसांनी प्रतिबंधित गुटख्याच्या कारवाई दरम्यान, १ किलो गांजा जप्त करीत दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. रेहबर शराफत अली खान, कमरूजम्मा सादिकअली अन्सारी (५०) अशी अटक केलेल्या गुटखा माफियांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुटखा माफियांनी प्रतिबंधित गुटख्याची विक्रीच्या उद्देशाने साठवणूक करून ठेवल्याची खबर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी ९ जानेवारी रोजी सुभाषनगर पोलीस चौकी जवळील सुपर हॉटेलच्या मागील गल्लीमध्ये छापा टाकला असता, १ किलो ५० ग्रॅम वजनाचा ३२ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. त्यानंतर पोशि रूपेश रविदास जाधव यांच्या फिर्यादीवरून रेहबर आणि कमरूजम्मा या दोघांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in