
भिवंडी: भिवंडीत अवैधपणे घुसखोरी करून भाड्यावर राहणाऱ्या बांगलादेशींवरील कारवाई पोलीस प्रशासनाने सक्त केली आहे. त्यातच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना भाडे तत्वावर वास्तव करणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. तर भिवंडीत मागील ९ दिवसांत अनधिकृतपणे बांगलादेशातून येवून भिवंडीत अनेक वेळापासून राहणाऱ्या एकूण १० बांगलादेशी तरुणांची धरपकड करण्यात पोलिसांना यश आले आहे. रमजान मो.अब्दुल रजाक शेख (३२) व कबीर फियार अहमद शेख (४०) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत.
दरम्यान यापूर्वी रेड लाईट परिसरातून ६ जणांना तर कल्याण रोड बाबला कंपाऊंड येथून २ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे हा बांगलादेशी घुसखोरांचा भिवंडीतील आकडा ९ दिवसांत १० वर पोहचला असून अनधिकृतपणे भिवंडीत वास्तव करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.