भिवंडीत अर्ध्या किमीवरच ११ गतिरोधक: खाडीपार ते काटई बाग मार्गावरील प्रकार; वाहन चालकांत संताप

भिवंडी - पारोळ महामार्गावरील खोणी ग्रामपंचायत हद्दीत खाडीपार ते काटई बाग या जेमतेम अर्ध्या किमीच्या मार्गात तब्बल ११ उंच गतिरोधक गेल्या काही दिवसात बनविण्यात आले आहेत.
भिवंडीत अर्ध्या किमीवरच ११ गतिरोधक: खाडीपार ते काटई बाग मार्गावरील प्रकार; वाहन चालकांत संताप

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील खोणी ग्रामपंचायत हद्दीत खाडीपार ते काटईबाग या मार्गावर अर्ध्या किलोमीटर अंतरावर ११ सिमेंटचे गतिरोधक बनविले असल्याने या मार्गावरून जाणारे वाहनचालक अक्षरशः वैतागले आहेत. हे गतिरोधक ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी बनविले असून, त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

भिवंडी - पारोळ महामार्गावरील खोणी ग्रामपंचायत हद्दीत खाडीपार ते काटई बाग या जेमतेम अर्ध्या किमीच्या मार्गात तब्बल ११ उंच गतिरोधक गेल्या काही दिवसात बनविण्यात आले आहेत. या गतिरोधकांवरून चारचाकी वाहने जात असताना ही वाहने कधी बंद पडतात, तर काही वाहनांचा खालील भाग गतिरोधकाला घासला जात आहे. त्यामुळे वाहन चालकांची सोय होण्याऐवजी त्यांचा खर्च वाढू लागला आहे. तर दुचाकी आणि तीन चाकीवरून दैनंदिन प्रवास करणारे विद्यार्थी, कामगार आणि व्यावसायिक यांना देखील सदर गतिरोधकांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच प्रवाश्यांची ने-आण करताना रिक्षा चालकांची चांगलीच दमछाक होत आहे. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांचा वाहने दुरुस्तीचा नाहक खर्च वाढला आहे. विशेष म्हणजे, रुग्णांना आणि गर्भवती महिलांना या गतिरोधकांमुळे इच्छीत स्थळी पोहचणे कठीण झाले आहे.

वास्तविक यापूर्वी रस्त्यांमधील गतिरोधकाने गर्भवती महिलांचे झालेल्या अपघातामुळे उच्च न्यायालयाने रस्त्यावर गतिरोधक बनविण्यासाठी बंदी केली होती. याकडे दुर्लक्ष करीत खोणी ग्रामपंचायतचे सरपंच अल्ताफ बाली यांनी हे गतिरोधक स्वखर्चाने बनविले आहेत. हे गतीरोधक बनविण्यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे भिवंडी - पारोळ रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमधून संताप व्यक्त केला जात असून, प्रवासात अडथळा ठरणारे सर्व गतिरोधक काढून टाकण्याची मागणी वाहन चालकांकडून होत आहे.

खोणी ग्रामपंचायत हद्दीत नव्याने रस्त्यावर बनविलेले गतिरोधक सरपंच अल्ताफ बाली यांनी स्वखर्चाने बनविले आहेत.

खोणी ग्रामपंचायत हद्दीत नव्याने रस्त्यावर बनविलेले गतिरोधक सरपंच अल्ताफ बाली यांनी स्वखर्चाने बनविले आहेत. - साक्षी शिंदे, ग्रामसेविका, खोणी ग्रामपंचायत

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in