स्विमिंग पूलमध्ये बुडून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू

भाईंदर पूर्वेच्या गोल्ड नेस्ट परिसरात असलेल्या मीरा-भाईंदर महापालिकेकडून संचलित स्व. गोपीनाथ मुंडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून ११ वर्षीय ग्रंथ हसमुख मुथा या चिमुकल्याचा रविवारी मृत्यू झाला.
स्विमिंग पूलमध्ये बुडून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू
Published on

भाईंंदर : भाईंदर पूर्वेच्या गोल्ड नेस्ट परिसरात असलेल्या मीरा-भाईंदर महापालिकेकडून संचलित स्व. गोपीनाथ मुंडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून ११ वर्षीय ग्रंथ हसमुख मुथा या चिमुकल्याचा रविवारी मृत्यू झाला. एवढा मोठा स्विमिंग पूल असतानाही त्याठिकाणी लाइफगार्ड ठेवलेला नव्हता, यामुळेच त्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून ठेका रद्द करावा अशी मागणी केली जात आहे.

मुथा यांच्या वडिलांच्या मते, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच त्यांच्या मुलाचा जीव गेला आहे. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in