१३ वर्षीय मुलीचा विनयभंग ; इस्लाम कबूल कर म्हणत दाखवला नकली बंदुकीचा धाक, भाईंदर येथील दोघांना अटक

दोन्ही तरुण १ जून पासून पीडित तरुणीकडे बघून अश्लील चाळे करुन बोलण्याचा प्रयत्न करत होते
१३ वर्षीय मुलीचा विनयभंग ; इस्लाम कबूल कर म्हणत दाखवला नकली बंदुकीचा धाक, भाईंदर येथील दोघांना अटक

भाईंदर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. यानंतर त्या मुलीला इस्लाम कबूल करण्यासाठी नकली बंदुकीचा धाक दाखवण्यात आला आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

पीडित मुलगी ही १३ वर्षाची असून भाईंदर येथील रहिवासी आहे. मुनव्वर मन्सुरी आणि अजीम मन्सुरी हे दोन्ही तरुण १ जून पासून पीडित तरुणीकडे बघून अश्लील चाळे करुन बोलण्याचा प्रयत्न करत होते. १२ जून रोजी मुलीला इमारतीच्या टॅरेसवर नेऊन मुन्नवर मन्सुरीने तिचा विनयभंग केला, अशी तक्रार मुलीच्या आईने दिली आहे. यानंतर त्याने मुलीला चैन, अंगठी आणि बुरखा दिला. तसंच बुरखा घालून तयार राहण्यास सांगितलं. मात्र, पीडितेने नकार दिल्यावर आरोपीने तिला नकली पिस्तुलाचा धाक दाखवत तु इस्लाम कबूल केला नाही तर तुला गोळ्या घालीन अशी धमकी दिली.

मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. यानंतर भाईंतर पोलिसांनी मुन्नवर अन्सारी आणि अजीम मन्सुरी या दोघांवर विनयभंगाच्या कमल ३५४, ३५४(अ), ५०६ तसंच पोक्सो कायद्याच्या कलम ८,४२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरु असून प्रकरण संवेदनशिल असल्याने त्याबाबत अधिक माहिती देता येणार नसल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.

logo
marathi.freepressjournal.in