ठाण्यातील १६ एसआरए प्रोजेक्ट क्लस्टरमुक्त

ठाणे शहरात क्लस्टर योजना राबवून वागळे इस्टेट, लोकमान्यनगर भागात क्लस्टरचा नारळही मुख्यमंत्र्यांनी फोडला.
ठाण्यातील १६ एसआरए प्रोजेक्ट क्लस्टरमुक्त

ठाणे : ठाणे शहरातील क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये १८ एसआरए प्रोजेक्ट अडकले होते. त्यामुळे झोपडपट्टीवासीयांचा पुनर्विकास अनेक वर्षांपासून रखडला होता.

हे प्रोजेक्ट कधी मार्गी लागतील, क्लस्टरचे काम केव्हा मार्गी लागणार या विवंचनेत अडकलेल्या एसआरएमधील १८ प्रकल्पग्रस्तांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे क्लस्टरमुक्तीची मागणी केली होती. याबाबत आमदार केळकर यांनी मुख्यमंत्री, गृहनिर्माण विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात आला. गुरुवारी आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील १६ एसआरए प्रोजेक्टर क्लस्टरमधून मुक्त करण्यात आल्याचा अहवाल पत्रकारांसमोर सादर केला. १६ एसआरए प्रोजेक्ट मार्गी लागल्याने पुनर्विकासापासून रखडलेल्या झोपडीधारकांचा प्रश्न मार्गी लागून लवकरच रखडलेल्या एसआरए योजना मार्गी लागतील, असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला.

ठाणे शहरात क्लस्टर योजना राबवून वागळे इस्टेट, लोकमान्यनगर भागात क्लस्टरचा नारळही मुख्यमंत्र्यांनी फोडला. क्लस्टरचे ४० आराखडे तयार करण्यात आले होते. मात्र अनेक वर्षे सर्वेक्षणात अडकलेला क्लस्टर प्रत्यक्ष कधी मार्गी लागणार या विवंचनेत ठाण्यातील हजारो झोपडपट्टीवासी नागरिक होते. तसेच क्लस्टर योजनेपूर्वी अनेक एसआरए प्रकल्प मंजूर होवून ते राबविण्यासाठी विकासकांचीही नियुक्ती करण्यात आली होती. मात्र हे एसआरए प्रकल्प क्लस्टर योजनेत सामावून घेतल्याने एसआरए योजनेला खिळ बसली होती.

क्लस्टरमध्ये १८ एसआरए प्रकल्पांचाही समावेश करण्यात आल्याने आधीच रखडलेल्या एसआरए योजनाही २०२२ पासून रखडल्या होत्या. या एसआरए योजनांना क्लस्टरमधून वगळून आम्हाला स्वतंत्रपणे एसआरए पूर्ण करयाची मागणी त्या त्या एसआरए प्रवर्तक आणि विकासकांकडून आमदार संजय केळकर यांच्याकडे केली होती. याबाबत आमदार संजय केळकर यांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला. मुख्यमंत्री, गृहनिर्माण विभाग आणि संबंधित अधिकार्‍यांकडे पाठपुरावा करण्यात आला.

दोन वर्षांनंतर यश

गेली दोन वर्षे सुरू असलेल्या या पाठपुराव्याला अखेर यश मिळून गुरुवारी १८ पैकी १६ एसआरए प्रकल्प क्लस्टर योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्य शासनाने १६ एसआरए प्रकल्पांना क्लस्टरमधून वगळल्याने शासनाचे अभिनंदन केले. १८ एसआरए प्रकल्पांमध्ये कोपरीतील ५ एसआरए प्रकल्पांचा समावेश आहे. इतर प्रकल्प ठाणे शहरातील खोपट, चंदनवाडी, करवालोनगर, पाचपाखाडी, वर्तकनगर आदी भागातील असल्याचे आमदार केळकर यांनी नमूद केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in